महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल वाचा एकाच ठिकाणी

On: June 5, 2024 8:34 AM
Loksabha Result
---Advertisement---

Loksabha Result l लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. या लोकसभा निवडणुकीच्या निकालात अत्यंत मोठ्या फरकारने आघाडी-पिछाडी पाहायला मिळाली आहे. या निवडणूक निकालात महाराष्ट्रात सर्वाधिक जागा काँग्रेस पक्षाला मिळाल्या आहेत. काँग्रेसला तब्बल १३ जागा मिळाल्या आहेत तर भाजपला अवघ्या ९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक मोठा पक्ष हा काँग्रेस झाला आहे.

Loksabha Result l महाविकास आघाडीने मिळवल्या सर्वाधिक जागा :

लोकसभा निवडणूक निकालात महाराष्ट्रात महाविकास आघाडीने 30 जागांवर विजय मिळवला आहे. तर महायुतीने 17 जागांवर विजय आळवला आहे. महायुतीच्या सर्व महानाट्यामुळे काँग्रेसला फटका बसल्याची शंका वर्तवली जात आहे.

या सर्व लढाईत विशाल पाटील हे अपक्ष निवडणून आले आहे. याशिवाय लाखांहून अधिक मताने विशाल पाटील विजयी झाले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुप्रिया सुळे यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या म्हणाल्या आहेत की, आमचा लढा वैचारिक होता. वैयक्तिक भांडण नव्हते. सुनेत्रा पवार समोर होत्या पण माझा लढा हा वैयक्तिक लढा नव्हता.

महाराष्ट्रातील 48 जागांवरील निकाल :

अमरावती – बळवंत वानखेडे – काँग्रेस – 1,59,120
रामटेक – श्यामकुमार बर्वे – काँग्रेस – 76,768
भंडारा-गोंदिया – डॉ. प्रशांत पडोळे – काँग्रेस – 36,881
गडचिरोली-चिमूर – नामदेव किरसान – काँग्रेस – 1,41,696
चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर – काँग्रेस – 2,60,406
नांदेड – वसंत चव्हाण – काँग्रेस – 59,442
जालना – कल्याण काळे – काँग्रेस -1,09,695
लातूर – डॉ. शिवाजी काळगे – काँग्रेस – 61,881
नंदुरबार – गोवाल पाडवी – काँग्रेस -1,59,120
धुळे – डॉ. शोभा बच्छाव – काँग्रेस – 4,714
उत्तर मध्य मुंबई – वर्षा गायकवाड – काँग्रेस – 16,514
सोलापूर – प्रणिती शिंदे – काँग्रेस – 74,197
कोल्हापूर – शाहू महाराज छत्रपती – काँग्रेस – 1,54,964
अकोला – अनुप धोत्रे – भाजप – 40,626
नागपूर – नितीन गडकरी – भाजप -1,37,603
जळगाव – स्मिता वाघ – भाजप – 2,51,594
रावेर – रक्षा खडसे – भाजप – 2,72,183
उत्तर मुंबई – पियुष गोयल – भाजप – 3,57,608
पालघर – डॉ. हेमंत सावरा – भाजप -1,83,306
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नारायण राणे – भाजप – 47,858
पुणे – मुरलीधर मोहोळ – भाजप -1,23,038
सातारा – उदयनराजे भोसले – भाजप – 32,771
यवतमाळ- वाशिम – संजय देशमुख – शिवसेना (UBT) – 94,473
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर – शिवसेना (UBT) – 1,08,602
परभणी – संजय जाधव – शिवसेना (UBT) – 1,36,608
धाराशिव – ओमराजे निंबाळक – शिवसेना (UBT) – 3,29,846
नाशिक – राजाभाऊ वाजे – शिवसेना (UBT) -1,62,836
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे – शिवसेना (UBT) – 50,529
उत्तर पूर्व मुंबई – संजय दिना पाटील – शिवसेना (UBT) – 29,861
दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई – शिवसेना (UBT) – 53,384
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत – शिवसेना (UBT) – 52,673
रायगड – सुनील तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस – 82,784
बुलढाणा – प्रतापराव जाधव – शिवसेना – 29,479
औरंगाबाद – संदीपान भुमरे – शिवसेना – 1,34,650
उत्तर पश्चिम मुंबई – रवींद्र वायकर – शिवसेना – 48
कल्याण – श्रीकांत शिंदे – शिवसेना – 2,09,144
ठाणे – नरेश म्हस्के – शिवसेना – 2,17,011
हातकणंगले – धैर्यशील माने – शिवसेना – 13,426
मावळ – श्रीरंग बारणे – शिवसेना – 96,615
दिंडोरी – भास्करराव भगरे – राष्ट्रवादी काँग्रेस (SP) – 1,13,199
वर्धा – अमर काळे – राष्ट्रवादी काँग्रेस (SP) – 77,432
अहमदनगर – निलेश लंके – राष्ट्रवादी काँग्रेस (SP) – 28,929
भिवंडी – सुरेश म्हात्रे – राष्ट्रवादी काँग्रेस (SP) – 66,121
बारामती – सुप्रिया सुळे – राष्ट्रवादी काँग्रेस (SP) -1,33,568
शिरुर – डॉ. अमोल कोल्हे – राष्ट्रवादी काँग्रेस (SP) -1,40,951
माढा – धैर्यशील मोहिते पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस (SP) -1,20,837
बीड – बजरंग सोनवणे – राष्ट्रवादी काँग्रेस (SP) – 
 2688
सांगली – विशाल पाटील – अपक्ष – 1,00,259

News Title : Maharashtra Loksabha Result

महत्त्वाच्या बातम्या- 

महाराष्ट्रात सर्वाधिक स्ट्राईक रेटसह सर्वात मोठा पक्ष कोणता?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now