महाराष्ट्र लोकसभा निकाल पाहा सर्वात आधी अवघ्या एका क्लिकवर!

On: June 4, 2024 6:15 PM
Loksabha Result
---Advertisement---

Loksabha Live result l देशभरात लोकसभा निवडणुकीच्या निकालाची रणधुमाळी सुरु आहे. अशातच या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांनी आघाडी घेतली होती तर काही दिग्गज नेते पिछाडीचा सामना करत आहेत. अशातच आता राज्यातील काही मतदारसंघातील निकाल हाती येत आहे. त्यामुळे विजयचा गुलाल उधळायची सुरवात झाली आहे.

कोणत्या मतदारसंघात कोणी मारली बाजी :

– अहमदनगर मतदारसंघातील अत्यंत चुरशीच्या लढतीत शरदचंद्र गटाचे निलेश लंके विजयी

– बारामतीमधून महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे विजयी झाल्या आहेत; एक लाखांहून अधिक मतांनी विजयी

– रावेर लोकसभेत भाजपच्या रक्षा खडसे यांचा विजय

– राज्यात सर्वाधिक लक्ष लागलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघांमध्ये विशाल पाटील यांनी गुलाल उधळला आहे.

– नंदुरबारमध्ये महाविकास आघाडीचे नेते गोवाल पाडवी हे विजयी झाले आहेत.

– चंद्रपूरमध्ये महाविकास आघाडीच्या प्रतीभा धानोरकर यांची विजयी सलामी . सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव.

– पालघरमध्ये भाजपने विजयी पताका फडकावले आहे. कारण पालघरमध्ये हेमंत सावरा विजयी झाल्या आहेत.

– हिंगोलीतून ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विजयी

– हातकणंगले लोकसभा मतदार संघातून धैर्यशील माने १४ हजार मतांनी विजयी

 

लोकसभा निवडणुकीचा लाईव्ह निकाल :

– मावळमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उधळला विजयाचा गुलाल; ठाकरे गटाला बसला मोठा धक्का

– मावळमध्ये महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी उधळला विजयाचा गुलाल; ठाकरे गटाला बसला मोठा धक्का

– मुंबईमधून ठाकरेंचा दुसरा विजय, उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तिकरांनी फडकावली विजयी पताका!

– शिरूर मतदार संघातून आढळराव पाटलांचा दारुण पराभव; महाविकास आघाडीचे नेते अमोल कोल्हे विजयी

– नारायण राणे विजयी तर विनायक राऊत यांना पराभवाचा करावा लागला सामना

– उत्तर पश्चिममध्ये अमोल कीर्तिकारांचा दणदणीत विजय

– पुण्यातून महायुतीचे मुरलीधर मोहोळ यांचा विजय; धंगेकरांचा दारुण पराभव

– लातूरमध्ये भाजपला धक्का; काँग्रेसचे शिवाजीराव काळगे विजयी

– अनिल देसाईंचा 53, 384 मतांनी विजय

– नागपुरातून भाजपचे नितीन गडकरी यांचा विजय

– बुलढाणा महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव विजयी

– अमरावतीमधून बळवंत वानखेडे विजयी; नवनीत राणांचा पराभव

– उत्तर मुंबईतून पियुष गोयल विजयी

– कोल्हापुरातून काँग्रेसचे शाहू महाराज विजयी

– कल्याणमधून शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी

– जळगावमधून भाजपच्या स्मिता वाघ विजयी

– ठाण्यातून नरेश मस्के विजयी

– छत्रपती संभाजीनगर महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे 1 लाखांहून अधिक मतांनी
विजयी

– रावेरमधून रक्षा खडसे विजयी

– सोलापुरातून प्रणिती शिंदे 81 हजारांच्या मताधिक्याने विजयी; राम सातपुतेंचा पराभव

News Title- Maharashtra Loksabha Elelction Result

महत्वाच्या बातम्या-

महाविकास आघाडीने विजयाचं खातं उघडलं; ‘या’ नेत्याने मारली बाजी

काँग्रेस सत्तेत येणार?, भाजपविरोधात टाकला आतापर्यंतचा सर्वात मोठा डाव

दिंडोरीत शरद पवारांच्या उमेदवाराला मोठा धोका, अपक्ष भगरेंना मोठं मतदान

वंचित मतांपासून सुद्धा वंचित!, पुणे, बीड, धाराशिव, परभणी आणि अकोल्यात फक्त एवढी मतं

सर्वात मोठी बातमी! सेक्स स्कँन्डल प्रकरणातील आरोपी प्रज्वल रेवन्नाचा पराभव

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now