राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर, जाणून घ्या सर्व माहिती एका क्लिकवर

On: November 4, 2025 5:33 PM
Local Body Elections
---Advertisement---

Local Body Election | राज्यातील राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखांची अखेर घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने (Maharashtra State Election Commission) आज पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेली प्रतिक्षा अखेर संपली आहे. (Local Body Election)

निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर :

मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोगाने सांगितले की, २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल. या निवडणुकांमध्ये २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायती सहभागी होणार आहेत. यामध्ये काही नव्या स्थानिक स्वराज्य संस्थांचाही समावेश आहे.

एकूण ६ हजार ८५९ सदस्य आणि २८८ अध्यक्षांची निवड या निवडणुकांमधून केली जाणार आहे. राज्यभरात निवडणुकीचा माहोल निर्माण झाला असून, विविध पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

Local Body Election | महत्वाच्या तारखा :

नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात: १० नोव्हेंबर २०२५
अंतिम मुदत: १७ नोव्हेंबर २०२५
छाननी: १८ नोव्हेंबर २०२५
माघारीची अंतिम मुदत : २१ नोव्हेंबर २०२५
अपील असलेल्या ठिकाणी अंतिम मुदत: २५ नोव्हेंबर २०२५
मतदानाचा दिवस: २ डिसेंबर २०२५
मतमोजणीचा दिवस: ३ डिसेंबर २०२५

मतदारसंख्या आणि मतदान केंद्रे :

राज्यातील या निवडणुकांसाठी एकूण १ कोटी ७ लाख ३ हजार ५७६ मतदार पात्र आहेत.

पुरुष मतदार: ५३,७९,९३१
महिला मतदार: ५३,२२,८७०
इतर मतदार: ७७५
एकूण १३,३५५ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत.

आरक्षित जागांचा तपशील :

एकूण ३,८२० प्रभागांमध्ये ही निवडणूक होत असून, खालीलप्रमाणे आरक्षण निश्चित करण्यात आलं आहे.

महिलांसाठी जागा: ३,४९२
अनुसूचित जातींसाठी जागा: ८९५
अनुसूचित जमातींसाठी जागा: ३३८
मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा: १,८२१

जिल्हावार विभागणी :

कोकण विभाग: २७ संस्था
नाशिक विभाग: ४९ संस्था
पुणे विभाग: ६० संस्था
छत्रपती संभाजीनगर विभाग: ५२ संस्था
अमरावती विभाग: ४५ संस्था
नागपूर विभाग: ५५ संस्था

निवडणूक आयोगाने यावेळी आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा केली आहे. तसेच मद्य, पैसा आणि इतर आकर्षणे वापरणाऱ्यांवर कठोर कारवाई होईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. पोलिस प्रशासन, बँका, पतपेढ्या आणि वाहतूक यंत्रणा यांच्यावर विशेष लक्ष ठेवण्यात येणार आहे.

News Title: Maharashtra Local Body Elections 2025 Announced | Voting on December 2, Counting on December 3 | Full Schedule & Voter Details

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now