Maharashtra E-Bike Taxi | महाराष्ट्र सरकारने शाश्वत आणि पर्यावरणपूरक वाहतूक प्रणालीसाठी आजपासून ई-बाईक टॅक्सी सेवा सुरू केली आहे. नव्या धोरणानुसार ही सेवा अधिकृतपणे सुरू करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली आहेत. यामुळे प्रवाशांना स्वस्त, जलद आणि पर्यावरणस्नेही प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
भाडे संरचना – किती लागणार खर्च? :
या धोरणानुसार, प्रवाशांकडून पहिल्या १.५ किमी साठी फक्त १५ रुपये भाडे आकारले जाणार आहे. त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त किलोमीटरसाठी १० रुपये २७ पैसे आकारले जातील. त्यामुळे छोट्या अंतरावरील प्रवासासाठी ही सेवा परवडणारी ठरणार आहे. (Maharashtra E-Bike Taxi)
Maharashtra E-Bike Taxi | धोरणातील मुख्य नियम :
– प्रत्येक कंपनीकडे किमान ५० इलेक्ट्रिक बाईक असणे बंधनकारक.
– चालकाचे वय २० ते ५० वर्षांदरम्यान असणे आवश्यक.
– चालकाकडे वैध परवाना आणि पोलिस पडताळणी असणे गरजेचे. (Maharashtra E-Bike Taxi)
– प्रत्येक ई-बाईकमध्ये जीपीएस ट्रॅकिंग आणि आपत्कालीन संपर्क सुविधा असणे आवश्यक.
– सर्व वाहनांवर “बाईक टॅक्सी” असा स्पष्ट उल्लेख असणे बंधनकारक.
– वाहने फक्त वाहतूक विभागाच्या परवान्याने चालवली जाऊ शकतील.
प्रवाशांना मिळणारे फायदे :
– वाहतूक कोंडी कमी होईल – दुचाकींमुळे लहान रस्त्यांवरही सहज प्रवास शक्य.
– त्वरित सेवा – अॅप-आधारित बुकिंगमुळे तत्काळ उपलब्धता.
– पर्यावरणपूरक प्रवास – इलेक्ट्रिक बाईकमुळे प्रदूषणात घट.
– कमी खर्च – ऑटो वा टॅक्सीपेक्षा स्वस्त प्रवास.
– सुरक्षितता – चालक पडताळणी, जीपीएस आणि इन्शुरन्सची हमी.
ही योजना विशेषत: मुंबईसारख्या महानगरांसाठी उपयोगी ठरणार आहे. मात्र, सुरक्षेचे कठोर निकष, चार्जिंग स्टेशनची उपलब्धता आणि पारंपरिक टॅक्सी-रिक्षाचालकांचा विरोध या सर्व बाबींवर यशस्वितेचे भवितव्य अवलंबून असेल.






