Maharashtra Rain Alert | राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. बीडमधील पाटोदा येथे तब्बल 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अहिल्यानगर, सोलापूर, जळगाव, धाराशिव आणि संभाजीनगर येथेही मुसळधार पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने पुढील आठवडाभर पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (Maharashtra Rain Alert)
मुसळधार पावसाची भीती :
मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असून सोबतच 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार आहेत. कोकण-गोव्यातही हलका ते मध्यम पाऊस होणार आहे. गेल्या काही दिवसांत लाखो एकरवरील पिकांचे नुकसान झाले असून, अनेक घरं व जिवावर उदार झालेल्या संसारांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी व नागरिक चिंतेत आहेत. (Maharashtra Rain Alert)
नवरात्रीच्या सुरुवातीपासूनच पावसाचे थैमान सुरू असून पिके, जनावरे आणि घरांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती अधिक गंभीर ठरत असून त्यांच्या मेहनतीचे पाणी पाणी झाले आहे. सरकार आणि प्रशासनाने तातडीने मदतीची प्रक्रिया सुरू केली आहे, मात्र हवामान विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.
Maharashtra Rain Alert | सहा दिवसांचा पावसाचा अंदाज :
हवामान विभागाने पुढील सहा दिवस राज्यात मुसळधार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
23 सप्टेंबर: नाशिक, सोलापूर, लातूर, परभणी या जिल्ह्यांत पावसाची शक्यता.
24 सप्टेंबर: पूर्व विदर्भात मध्यम स्वरूपाचा पाऊस.
25 सप्टेंबर: नागपूर, गडचिरोली, चंद्रपूरमध्ये जोरदार पाऊस.
26-27 सप्टेंबर: पुणे, रायगड, सातारा, बीड, सोलापूर, लातूर, नांदेड जिल्ह्यांत अतिजोरदार पावसाचा इशारा.
28 सप्टेंबर: मुंबई, ठाणे, कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पाऊस.
प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा :
हवामान विभागाने यलो व ऑरेंज अलर्ट (Rain Orange Alert) जारी केला असून पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, आवश्यक असल्यास स्थलांतर करावे, तसेच नदी-नाल्यांच्या काठावर न थांबण्याचा सल्ला दिला आहे. (Maharashtra weather forecast)
तसेच पुढील आठवड्यात परिस्थिती अधिक गंभीर राहू शकते, त्यामुळे सुरक्षिततेची खबरदारी घेणे अत्यावश्यक आहे.






