Anukampa Recruitment | राज्य सरकारने अनेक वर्षांपासून रखडलेल्या अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रियेला गती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. याअंतर्गत राज्यभरातील जवळपास ९,६५८ जागा भरल्या जाणार असून, ही प्रक्रिया येत्या १५ सप्टेंबर २०२५ पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणार आहे. या निर्णयामुळे प्रतीक्षेत असलेल्या सुमारे १० हजार उमेदवारांचे स्वप्न पूर्ण होणार आहे. (Anukampa Recruitment 2025)
कुठे-कुठे होतील नियुक्त्या? :
या भरतीत चतुर्थ श्रेणीतील जागांचा मोठा वाटा असून, त्या थेट शासकीय व्यवस्थेमार्फत भरल्या जाणार आहेत. यामध्ये महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांमधील एकूण ९,५६८ उमेदवारांचा समावेश आहे.
महानगरपालिका – ५,२२८ उमेदवार प्रतीक्षेत
जिल्हा परिषद – ३,७०५ उमेदवार प्रतीक्षेत
नगरपालिका – ७२५ उमेदवार प्रतीक्षेत
विशेष म्हणजे, नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक ५०६ उमेदवार, पुणे जिल्ह्यात ३४८, गडचिरोलीत ३२२ आणि नागपूरमध्ये ३२० उमेदवार प्रतीक्षेत होते. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
Anukampa Recruitment | अनुकंपा धोरण म्हणजे काय? :
अनुकंपा धोरण १९७३ पासून लागू आहे. शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये कार्यरत असताना एखाद्या कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास, त्याच्या कुटुंबातील पात्र वारसाला नोकरी देण्याची तरतूद या धोरणात आहे. हे धोरण मुख्यत्वे गट-क आणि गट-ड पदांसाठी लागू होते. (Anukampa Recruitment 2025)
गेल्या काही वर्षांपासून या भरतीत विलंब होत होता. परिणामी हजारो उमेदवार प्रतीक्षेत होते. आता सरकारने निर्णय घेऊन ही प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक व सामाजिक आधार मिळणार आहे.






