Maharashtra Government । सध्या सुरु असणाऱ्या महागाई आणि मंदीमुळे सगळीकडेच आर्थिक असमतोल पाहायला मिळत आहे. अनेक राष्ट्रांमध्ये तर यामुळे सत्तापालट झाल्याचेही पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रही या परिस्थितीतून सुटलेला नाही आणि या समस्येला सोडवण्यासाठी आणि आर्थिक स्थिरता आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत सरकारने मालमत्ता आणि कर्ज व्यवस्थापन साठी स्वतंत्र कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. (Maharashtra Government)
कंपनीच्या स्थापनेला राज्य सरकार कडून मंजुरी दिली :
या कंपनीचे नाव MAHA ARC LIMITED कंपनी असे असणार आहे. ही कंपनी राज्य शासनाच्या मालमत्ता गुंतवणूक आणि आर्थिक साधनांचे पुनर्वापर आणि पुनर्रचना करण्याचे कार्य करणार असून, या कंपनीच्या स्थापनेला राज्य सरकार कडून मंजुरी दिली आहे. राज्य मालमत्तेचा अधिक व्यवस्थित वापर व्हावा, आर्थिक स्थिरता यासाठी ही कंपनी मध्यस्ती करणार असल्याची माहित मिळाली आहे. यामधून अनेक आर्थिक उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होणार आहे.
राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक नियोजनासाठी आणि राजकोषीय स्थैर्यासाठी हे एक महत्वाचं पाऊल ठरू शकते. अनेक राजकीय मालमत्ता आणि आर्थिक संसाधने निष्क्रिय आहेत किंवा सरकारला त्यांचा उपयोग कमी प्रमाणावर होतो. परिणामी सरकारला त्याचा हवा तसा मोबदला मिळत नाही. ही कंपनी अशा घटकांचे नियोजन करणार आहे.
Maharashtra Government | काय असणार आहे कंपनीचे काम? :
1. महाराष्ट्र राज्याची मालमत्ता व्यवस्थित, पारदर्शक आणि व्यावसायिक पद्धतीने व्यवस्थापित करणे.
2. कंपनी निष्क्रिय किंवा अकार्यक्षम मालमत्तांचा आर्थिक पुनर्वापर करणार आहे.
3. शासनाच्या कर्ज आणि देणींचे संतुलन साधणार याकडे देखील कंपनीचे लक्ष राहणार आहे.
4. यामुळे राज्याच्या मालमत्तांचा उपयोग वाढण्यात मदत होईल, सोबतच निष्क्रिय संपत्ती आर्थिकदृष्ट्या सक्रिय होईल. (Maharashtra Government)
5. नवीन निधी उभारणीस मदत होणार असून , सरकारला भांडवली बाजारातून पैसा उभारता येणार आहे.
6. कर्ज व्यवस्थापनेत सुधारणा होईल. जुन्या कर्जाचे पुनर्विलोकन होऊन वित्तीय ताण कमी करता येणार आहे.
7. सरकारला अप्रत्यक्षरीत्या अधिक महसूल मिळू शकतो, ज्यात राजस्व वाढण्यास मदत






