Swapnil Kusale | पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील स्वप्निल कुसळे याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याने 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकारात चमकदार कामगिरी करत भारताला तिसरं (Swapnil Kusale ) पदक मिळवून दिलं आहे.
स्वप्निल भारताला ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक मिळवून देणारा खाशाबा जाधव यांच्यानंतरचा पहिलाच खेळाडू ठरला आहे. या कामगिरीनंतर कोल्हापूर येथे एकच जल्लोष करण्यात आला.या स्पर्धेत स्वप्निलने एकुण 451.4 गुण प्राप्त केले.
ऑलिम्पिकमध्ये मोठी कामगिरी करणारा स्वप्निल हा वयाच्या 14 व्या वर्षापासून म्हणजेच 2009 पासून नेमबाजीचा सराव करत आहे. या खेळाचा खर्च अधिक असतो.रायफल, जॅकेट यांवर बराच खर्च लागतो. एका बुलेटसाठी देखील खूप पैसे लागत असतात.
वडिलांनी कर्ज घेऊन स्वप्निलला प्रोत्साहन दिलं
स्वप्निलने खूप संघर्ष करून इथपर्यंत मजल मारली आहे. एक काळ असा होता, जेव्हा सरावासाठी बुलेट्स खरेदी करायला देखील त्यांच्याकडे पैसे नव्हते. मात्र, स्वप्निलच्या वडिलांनी आपल्या मुलाचा खेळ थांबू नये म्हणून कर्ज काढलं आणि मुलाला खेळासाठी प्रोत्साहन दिलं. यासाठी त्यांनी बँकेकडून कर्ज घेतलं आणि बुलेट्स खरेदीसाठी पैसे दिले.
तेव्हा एक बुलेटची किंमत 120 रुपये होती.त्यामुळे स्वप्निल (Swapnil Kusale ) नेमबाजीचा सराव करताना प्रत्येक बुलेट काळजीपूर्वक वापरायचा. काही मीडिया रिपोर्टनुसार, पॅरिस ऑलम्पिकला जाण्याआधी महाराष्ट्र सरकारने स्वप्नीलला 50 लाख रुपये देण्याचे जाहीर केले होते. यासाठी आवश्यक असणारी सर्व कागदपत्रे जोडूनही एक पैसा मिळाला नसल्याचं स्वप्नील कुसाळेचे मार्गदर्शक अक्षय अष्टपुत्रे यांनी म्हटलं आहे.
पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतील आपल्या उत्तुंग यशामुळे स्वप्नीलने महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली..!
पॅरीस ऑलिंपिक २०२४ मध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणाऱ्या स्वप्नील कुसाळेच्या कुटुंबियांशी आज मंत्रालयातील दालनातून दूरध्वनीद्वारे संपर्क साधून कुसाळे कुटूंबियांचे अभिनंदन… pic.twitter.com/YSB2EnB36T
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 1, 2024
स्वप्नील कुसाळेला 1 कोटी रुपयांचे पारितोषिक
आज त्याने ब्राँझ जिंकले म्हणून कौतुक होतेय, पण जर सरकारी मदत वेळेवर मिळाली असती. तर आज चित्र अजून वेगळे असते, अशी प्रतिक्रिया अक्षय अष्टपुत्रे यांनी दिली आहे.आज ऑलिम्पिकमध्ये मोठी कामगिरी केल्यानंतर स्वप्नील कुसळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1 कोटी रुपयाचे पारितोषिक जाहीर केले आहे. याशिवाय स्वप्निलला (Swapnil Kusale ) नेमबाजीतील पुढील तयारीसाठी आवश्यक, त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
दरम्यान, स्वप्निल सध्या मध्य रेल्वेच्या पुणे डिव्हिजन मध्ये टीसी म्हणून काम करतोय.ज्यावेळेस स्वप्निल हा पॅरिस हून भारतात येईल त्यावेळेस भारतीय रेल्वेकडून त्याचा यथोचित सन्मान केला जाईल आणि ताबडतोब त्याला ऑफिसर म्हणून प्रमोशन देण्यात येणार आहे, अशी घोषणा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केली आहे.
News Title – Maharashtra government announced help to Swapnil Kusale before going to Olympics
महत्वाच्या बातम्या-
अटकेच्या भीतीने पूजा खेडकर परदेशी फरार?, मोठी अपडेट समोर
ग्राहकांना झटका! सोनं पुन्हा महागलं, 10 ग्रॅमसाठी आता..
राहुल गांधींचा ट्वीट करत गंभीर दावा; देशभर एकच खळबळ
‘या’ 5 राशींसाठी आजचा दिवस अत्यंत शुभ, सर्व इच्छा-आकांक्षा होणार पूर्ण
“नकार देऊन सुद्धा मला मित्रासोबत झोपायला…”, करिश्माच्या खुलाशाने बाॅलिवूड हादरलं






