महाराष्ट्रात 3 वंदे भारत एक्स्प्रेस सुरु, ‘या’ जिल्ह्यांना जोडणार

On: September 21, 2024 12:39 PM
Pune News
---Advertisement---

Vande Bharat Trains l वंदे भारत एक्स्प्रेस ही सुपरफास्ट एक्स्प्रेस प्रवाशांच्या हिताची ठरली आहे. त्यामुळे प्रवाशांचे हित लक्षात घेऊन देशभरातील विविध जिल्ह्यात वंदे भारत एक्स्प्रेसचा लोकार्पण सोहळा पार पडत आहे. अशातच आत्तापर्यंत महाराष्ट्राला देखील 11 वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या आहेत. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील 3 वंदे भारत एक्स्प्रेसना हिरवा झेंडा दाखवला आहे. मात्र आता आपण या तीन एक्स्प्रेस नेमक्या कुठे धावणार आहेत हे जाणून घेऊयात…

त्या तीन नवीन वंदे भारत एक्स्प्रेस नेमक्या कोणत्या? :

नागपूर-सिंकदराबाद-नागपूर एक्स्प्रेस :

नागपूर-सिंकदराबाद-नागपूर वंदे भारत 16 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. ही गाडी मंगळवार वगळता आठवड्यातील सहाही दिवस धावणार आहे. ही ट्रेन तब्बल 575 किमी अंतर अवघ्या 7 तास आणि 15 मिनिटांत पूर्ण करत आहे. तसेच ही एक्स्प्रेस नागपूर-हैदराबाद आणि सिकंदराबाद या तीन शहरांना जोडते.

सर्वात महत्वाचं म्हणजे वंदे भारत एक्स्प्रेस नागपूर जंक्शन येथून पहाटे पाच वाजता सुटते. तर, सिकंदराबाद येथे दुपारी 12.15 वाजता पोहोचत आहे. तर, नागपूर येथे परतताना दुपारी 1 वाजता सिकंदराबाद येथून सुटते आणि नागपूरला रात्री 8 वाजून 20 मिनिटांपर्यंत पोहोचते. तसेच सेवाग्राम, चंद्रपूर, रामगुंडम, बल्लारशा, काझीपेठ येथे या रेल्वेगाडीचे स्टॉप असणार आहेत.

Vande Bharat Trains l कोल्हापूर-पुणे-कोल्हापूर वंदे भारत एक्स्प्रेस :

गेल्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच 19 सप्टेंबर रोजी कोल्हापूर-पुणे ही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू झाली आहे. कोल्हापूर पुणे वंदे भारत ट्रेन आठवड्यातून दर सोमवार, गुरुवार आणि शनिवारी सकाळी सव्वा आठ वाजता कोल्हापूर स्थानकावरून सुटत आहे. तर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही गाडी पुणे स्टेशनवर पोहचत आहे. तसेच पुण्यावरून दर बुधवार, शुक्रवार व रविवारी दुपारी ही गाडी दुपारी सव्वा दोन वाजता सुटणार आहे. तसेच ती एक्स्प्रेस सायंकाळी 7:40 वाजता कोल्हापूर रेल्वे स्थानाकावर पोहचणार आहे. याशिवाय कोल्हापूर-पुणे या प्रवासात ट्रेन मिरज, किर्लोस्करवाडी, कराड, सांगली, सातारा या स्थानकांवर स्टॉप असणार आहे.

पुणे-हुबळी वंदे भारत एक्स्प्रेस :

पुणे-हुबळी या वंदे भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण झाले असून 18 सप्टेंबरपासून ही एक्स्प्रेस धावण्यास सज्ज झाली आहे. ही ट्रेन शनिवारी आणि सोमवारी धावणार आहे. ही ट्रेन पुण्यातून दुपारी 2.15 वाजता सुटणार आहे, तर सांगलीत 6.10 ला, बेळगावला 8.34, धारवडला 10.30 पर्यंत पोहचणार आहे. तर हुबळीत रात्री 10.45 ला पोहोचेल. याशिवाय परतीच्या प्रवासात ही ट्रेन हुबळी-सांगली-पुणे अशी धावेल. ही ट्रेन दर बुधवार, शुक्रवार, रविवारी हुबळीहून पहाटे 5 वाजता सुटणार आहे. तर, धारवाडला पहाटे 5 वाजून 17 मिनिटांनी येणार आहे. तसेच बेळगावात सकाळी 6.55, सांगली 9.30 आणि पुण्यात 1.30 वाजता पोहोचणार आहे.

News Title : Maharashtra Gets Three New Vande Bharat Trains

महत्त्वाच्या बातम्या-

तिरुपती बालाजी प्रसादाच्या लाडूत ‘या’ जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; राम मंदिरात वाटप

मुलीला कन्या दिनानिमित्त द्या हटके शुभेच्छा; होईल खुश

CIDCO ची घरे झाली स्वस्त, नवी मुंबईसाठी ‘या’ तारखेला निघणार लॉटरी

राज्यावर परतीच्या पावसापूर्वी मोठं संकट, IMD ने दिला महत्वाचा इशारा

मोठी बातमी! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now