शेतकऱ्यांना मोठा दिलासा! 3720 कोटींचा पीक विमा मंजूर

On: May 13, 2025 11:35 AM
Maharashtra Cabinet
---Advertisement---

Crop Insurance | राज्यातील हजारो शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024 मध्ये नैसर्गिक आपत्ती आणि प्रतिकूल हवामानामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागलं. या नुकसानीच्या भरपाईसाठी राज्य सरकारने एकूण 3,720 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर (Crop Insurance) केला असून त्यापैकी 9 मे 2025 पर्यंत 3,126 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

उर्वरित रकमेतील 307 कोटी रुपयांचे वाटप लवकरच होणार असून, 287 कोटी रुपये विमा कंपन्यांना दुसरा हप्ता दिल्यानंतर वितरीत केले जाणार आहेत. शेतकरी संघटनांनी सरकारकडे लवकरात लवकर दुसरा हप्ता वितरित करण्याची मागणी केली आहे.

चार ट्रिगर्सवर आधारित विमा मंजुरी :

या भरपाईसाठी चार वेगवेगळ्या ट्रिगरवर आधारित मंजुरी देण्यात आली आहे:

स्थानिक नैसर्गिक आपत्ती – ₹2,720 कोटी
हंगामातील प्रतिकूल हवामान – ₹713 कोटी
काढणी पश्चात नुकसान – ₹270 कोटी
पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान – ₹18 कोटी

सध्या स्थानिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल हवामान या दोन घटकांअंतर्गतच भरपाई वाटप सुरू आहे. कारण राज्य सरकारने फक्त पहिल्या हप्त्याचा निधी विमा कंपन्यांना दिला आहे. या अंतर्गत मंजूर एकूण रक्कम 3,433 कोटी रुपये असून त्यापैकी 3,126 कोटी रुपये वाटप पूर्ण झाले आहे. (Crop Insurance)

Crop Insurance | दुसऱ्या टप्प्याचे वाटप थांबले :

काढणी पश्चात नुकसान आणि पीक कापणी प्रयोग आधारित नुकसान या टप्प्यांतील भरपाईसाठी शेतकऱ्यांना अजून प्रतीक्षा करावी लागणार आहे. हे वाटप राज्य सरकारकडून विमा कंपन्यांना दुसरा हप्ता दिल्यानंतरच होणार आहे.

9 मे 2025 पर्यंत भरपाईचे वितरण:

स्थानिक आपत्ती अंतर्गत: ₹2,418 कोटी
हंगामातील प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत: ₹708 कोटी

या निर्णयामुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला असला तरी, उर्वरित भरपाईसाठी तातडीने निधी वितरण करण्याची गरज शेतकरी संघटनांनी मांडली आहे. (Crop Insurance)

News Title : Maharashtra Farmers Get ₹3,720 Crore Crop Insurance Relief; ₹3,126 Crore Already Disbursed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now