निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच?, ‘हा’ नेता म्हणाला मुख्यमंत्री आमचाच

On: November 23, 2024 10:05 AM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra Election Result 2024 | राज्यात मतमोजणीला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रात सध्या महायुती 134 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तर महाविकास आघाडीला 126 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. असेच कल राहिल्यास महायुतीचे सरकार येण्याची (Maharashtra Election Result 2024) शक्यता आहे.

नेमकी कुणाची सत्ता येते? हे निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. तत्पुर्वी मुहायुतीत मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सूरू झाल्याचं दिसतंय. मुख्यमंत्रिपदावर शिंदे गटाने दावा केला आहे. शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मोठा दावा केला आहे.

या निवडणुकीसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी मेहनत घेतली. सुरूवातीच्या कलामध्ये महायुतीला बहुमत मिळण्याचं दिसून येतंय. महायुतीने विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढली. त्याला मतदारांनी मोठा प्रतिसाद दिला. महिला मतदारांनीही मोठा प्रतिसाद दिला आणि महायुतीला साथ दिल्याचं दिसून आलं. मुख्यमंत्री शिंदेंचे कर्तृत्व आणि त्यांची लोकप्रियता कामाला आल्याचं दिसून आलं, असं राजू वाघमारे म्हणालेत.

मुख्यमंत्री शिंदे हे सर्वसामान्यांचे नेते असून पहाटे पाच वाजेपर्यंत ते काम करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा महायुतीच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे एकनाथ शिंदेंचं पारडं हे अधिक जड असणार आहे. म्हणूनच मुख्यमंत्रिपदावर एकनाथ शिंदे यांचा दावा पहिला असेल, असं वाघमारे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

परळीत धनंजय मुंडे जोमात, तब्बल ‘इतक्या’ हजार मतांनी घेतली आघाडी!

विधानसभा LIVE अपडेट्स! पाहा कोण किती मतांनी आघाडीवर

राजकारणातील मोठ्या कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला; ‘या’ नेत्यांचं राजकीय भवितव्य धोक्यात

बारामतीत ‘पवार घराण्याची’ प्रतिष्ठा पणाला..! काका-पुतण्याच्या लढाईत कुणी घेतली आघाडी?

‘निकाल आल्यावर 48 तासांच्या आत…’; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now