महाराष्ट्रात थंडी वाढणार की कमी होणार? IMD ने वर्तवला अंदाज

On: November 25, 2024 4:57 PM
Weather Update
---Advertisement---

Weather Update l महाराष्ट्रात हळूहळू गारठा जाणवू लागला आहे. कारण आता उत्तर महाराष्ट्रात चांगलीच हुडहुडी जाणवत आहे. अशातच गेल्या आठ दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागला आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील गारठा वाढू लागला आहे.

राज्यात थंडी वाढणार? :

मात्र आता भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान देखील 10 अंशांखाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात यावर्षी कडाक्याची थंडी राहणार असून नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील तापमान देखील कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्यामुळे आता मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक भागातील किमान तापमान 10 अंशांखाली जाण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तरेकडून वारे वाहण्याची शक्यता असल्याने थंडी देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

Weather Update l आयएमडीचा अंदाज काय? :

प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस तापमानात काही फरक दिसणार नसला तरी देखील येत्या 24 तासानंतर 2 ते 3 अंशाने तापमान घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तसेच कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात देखील पुढील तीन ते चार दिवसात तापमान कमी होणार असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने सांगितलं आहे. याशिवाय पुढील चार ते पाच दिवसात विदर्भातील तापमानात काही फरक जाणवला नाही. दरम्यान, संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

News Title – Maharashtra Cold News

महत्त्वाच्या बातम्या-

पुढील सहा महिन्यांत पुन्हा निवडणुका होणार?

उद्धव ठाकरेंनी घेतला मोठा निर्णय, आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी

मुख्यमंत्री कोण होणार?; सर्वात मोठी अपडेट समोर

अखेर अभिषेकने ऐश्वर्यावर भाष्य केलं, चर्चांना उधाण

निवडणूक होताच शेतकऱ्यांना सर्वात मोठा झटका!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now