महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर! कोणाला लागणार लॉटरी?

On: December 1, 2024 11:27 AM
Bachchu Kadu
---Advertisement---

Maharashtra l राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार? याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. मात्र निकाल जाहीर होऊन कित्येक दिवस उलटले तरी देखील अद्याप सरकारची स्थापना झालेली नाही. परंतु, आता महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबरला पार पडणार आहे. मात्र अद्यापही मुख्यमंत्री कोण हे गुलदस्त्यात आहे.

शपथविधी कधी होणार? :

विधानसभेत महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदासह गृहमंत्रिपदावरुन देखील वाद सुरु आहे. पण आता हा वाद संपणार आहे. कारण 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मात्र आता या शपथविधी सोहळ्याला कोणकोणते मंत्री शपथ घेणार यांची संभाव्य नावे समोर आली आहेत.

येत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होणार असल्याची माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत दिली आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तसेच यावेळी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती मिळाली आहे. यासोबतच भाजपचे 10 ते 15 मंत्री शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Maharashtra l संभाव्य यादी समोर :

चंद्रशेखर बावनकुळे
सुधीर मुनगंटीवार
गिरीश महाजन
रवींद्र चव्हाण
राधाकृष्ण विखे पाटील
मंगल प्रभात लोढा
अतुल सावे
आशिष शेलार
पंकजा मुंडे
देवयानी फरांदे
नितेश राणे
गोपीचंद पडळकर
संजय कुटे या आमदारांना मंत्रि‍पदाची लॉटरी लागणार आहे. मात्र अद्याप या नावांबद्दल अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आली नाही.

News Title : Maharashtra CM Swearing Ceremony at 5 December First list of potential ministers 

महत्त्वाच्या बातम्या- 

मुंबई व ठाण्यात ‘इतके’ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!

जनतेचा कौल 5 महिन्यांत बदलला, आम्ही काय करणार?

2100 रुपये मिळणार की नाही?; इथे करा नवी लिस्ट चेक

आयकर विभागाची मोठी कारवाई, डोळे फिरवणारी रोकड लागली हाताला

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now