मंत्रीपदासाठी भाजपकडून पहिला फोन नितेश राणेंना, अजून कुणाकुणाला फोन?

On: December 15, 2024 9:47 AM
Maharashtra cabinet expansion will held today
---Advertisement---

Maharashtra cabinet expansion | महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला अखेर मुहूर्त मिळाला आहे. आज नागपूर येथे मंत्रीमंडळ विस्तार पार पडणार आहे. 1991 नंतर आज तब्बल 33 वर्षांनी नागपूरमध्ये मंत्रीमंडळ विस्तार पार पडतोय. आज दुपारी 4 वाजता हा सोहळा सुरू होईल. यावेळी 30 ते 32 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra cabinet expansion )

उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे कालच सर्व आमदार नागपुरात आले आहेत. प्रत्येक आमदार मंत्रिपदासाठी फोन केव्हा येतोय याची वाट बघत आहेत. अजितदादा गटाकडून काही आमदारांना रात्री फोन गेले आहेत. तर, भाजपाकडून देखील इच्छुक आमदारांना फोन करण्यात आल्याची माहिती आहे.

नितेश राणे यांना पहिला फोन?

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ज्यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे, अशा आमदारांना फोन केले असल्याची चर्चा आहे. यात पहिला फोन हा आमदार नितेश राणे यांना केला गेल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे कोकणात मंत्रिपद जाणार असल्याचं स्पष्ट झालंय. (Maharashtra cabinet expansion )

याचबरोबर भाजपाकडून यंदा आमदार पंकजा मुंडे यांना देखील संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय चंद्रकांत पाटील, जयकुमार रावल, पंकज भोयर, मंगलप्रभात लोढा आणि शिवेंद्रराजे भोसले यांनाही भाजपकडून मंत्रिपदासाठी फोन करण्यात आल्याची माहिती आहे.

भाजपच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-

कोकण-
1. रविंद्र चव्हाण
2. नितेश राणे

मुंबई
1. मंगलप्रभात लोढा
2. आशिष शेलार
3. अतुल भातखळकर

पश्चिम महाराष्ट्र
1. शिवेंद्रसिंहराजे भोसले
2. गोपीचंद पडळकर
3. माधुरी मिसाळ
4. राधाकृष्ण विखे पाटील (Maharashtra cabinet expansion )

विदर्भ
1. चंद्रशेखर बावनकुळे
2. संजय कुटे

उत्तर महाराष्ट्र
1. गिरीश महाजन
2. जयकुमार रावल

मराठवाडा
1. पंकजा मुंडे
2. अतुल सावे (Maharashtra cabinet expansion )

News Title – Maharashtra cabinet expansion will held today

महत्त्वाच्या बातम्या-

आज या’ राशींचं भाग्य खुलणार, राजकारणात लागणार मोठ्या पदाची लॉटरी

भावी मंत्र्यांना मध्यरात्री कॉल, शिवसेनेकडून ‘या’ नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी?

आज महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार, ‘हे’ आमदार घेणार मंत्रीपदाची शपथ?

आज मार्गशीर्ष पौर्णिमेला देवी लक्ष्मी ‘या’ राशींवर करणार धन व सुखाचा वर्षाव!

“उद्या काही स्फोट होईल तर…”; संतोष देशमुख हत्या प्रकरणी संभाजीराजेंचा इशारा

Join WhatsApp Group

Join Now