मोठी बातमी! छगन भुजबळांना मंत्रीमंडळात डच्चू?, तर धनंजय मुंडेंना ऐनवेळी फोन

On: December 15, 2024 1:43 PM
OBC Morcha
---Advertisement---

Maharashtra Cabinet Expansion | महायुती सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराला आता अवघे काही तास उरले आहेत. फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात कुणाला संधी मिळणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. भाजपा, शिवसेना तसेच राष्ट्रवादीकडून ज्यांची मंत्रीपदी वर्णी लागणार आहे, त्यांना थेट फोन करण्यात येत आहेत. आज दुपारपर्यंत अनेकांना फोन करण्यात आले आहेत. अशात राष्ट्रवादी गटातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. (Maharashtra Cabinet Expansion)

राष्ट्रवादीकडून आतापर्यंत सात मंत्र्यांची नावं जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांच्या यादीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे नावच नाही. त्यामुळे त्यांना डच्चू देण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच, धनंजय मुंडे यांचे देखील नाव जाहीर झाले नव्हते. मात्र, ऐनवेळी धनंजय मुंडे यांचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.तसेच मंत्र्यांच्या यादीत दिलीप वळसे, धर्मराव अत्राम,अनिल पाटील यांनांही मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. मंत्री ठरवायचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा आहे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. आज ते माध्यमांशी संवाद साधत होते.

राष्ट्रवादीकडून कुणाला आले फोन?

1. आदिती तटकरे
2. बाबासाहेब पाटील
3. दत्तमामा भरणे
4. हसन मुश्रीफ
5. नरहरी झिरवाळ
6. मकरंद पाटील
7. इंद्रनील नाईक
8. धनंजय मुंडे
9. माणिकराव कोकाटे (Maharashtra Cabinet Expansion)

भाजपकडून कुणाला आले फोन?

1. नितेश राणे
2. शिवेंद्रराजे भोसले
3. चंद्रकांत पाटील
4. पंकज भोयर
5. मंगलप्रभात लोढा
6. गिरीश महाजन
7. जयकुमार रावल
8. पंकजा मुंडे
9. राधाकृष्ण विखे पाटील
10. गणेश नाईक
11. मेघना बोर्डीकर
12. अतुल सावे
13. जयकुमार गोरे
14. माधुरी मिसाळ
15. चंद्रशेखर बावनकुळे
16. संजय सावकारे
17. अशोक उईके
18. आकाश फुंडकर
19. आशिष शेलार (Maharashtra Cabinet Expansion)

News Title : Maharashtra Cabinet Expansion chhagan bhujbal name dropped

महत्वाच्या बातम्या –

रोहित पवार, जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेणार? तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती

मस्साजोग प्रकरण भोवले, धनंजय मुंडेंना मंत्रीमंडळात मिळणार डच्चू?

महायुतीची मोठी खेळी! पुण्यातील ‘या’ महिला आमदाराला मिळणार मंत्रिपद?

फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात ‘या’ लाडक्या बहीणींना मंत्रिपदाची लॉटरी?

अवघ्या काही तासात राज्याला मिळणार नवे मंत्री; ‘या’ नेत्यांच्या नावांची चर्चा

Join WhatsApp Group

Join Now