महायुतीची मोठी खेळी! पुण्यातील ‘या’ महिला आमदाराला मिळणार मंत्रिपद?

On: December 15, 2024 12:20 PM
Maharashtra
---Advertisement---

Pune Politics l विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री बनले. यानंतर सर्वांचंच लक्ष हे मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं होतं. अखेर आता मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे.

फडणवीस सरकारमध्ये काही महिला आमदारांची वर्णी लागणार :

आज नागपूर येथे सायंकाळी 4 वाजता महायुती सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार पार पडणार आहे. यामध्ये भाजपचे 21, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेणार आहेत. तसेच, फडणवीस सरकारमध्ये काही महिला आमदारांची देखील वर्णी लागणार आहे.

विधानसभेत भाजपाच्या 14, शिवसेनेच्या 2 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या 4 महिला आमदार निवडून आल्या. सध्या ज्या आमदारांची नावं मंत्रीपदासाठी सर्वाधिक चर्चेत आहेत त्यात भाजपाकडून पंकजा मुंडे, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ यांचा समावेश आहे. तर राष्ट्रवादीकडून अदिती तटकरे यांच्या नावाचा समावेश मंत्रीमंडळामध्ये करण्यात आल्याची माहिती आहे.

Pune Politics l पुण्यातील महिला आमदाराला मिळणार मंत्रिपद :

अशातच आता पुण्याच्या महिला आमदाराला देखील मंत्री मिळणार असल्याची चर्चा आहे. यावेळी पुण्याच्या पर्वती विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपाच्या आमदार माधुरी मिसाळ यांची देखील मंत्रिपदावर वर्णी लागणार असल्याचं बोललं जात आहे.

कारण माधुरी मिसाळ या 2009 पासून आमदार आहेत. तसेच भाजपाचे छत्रपती संभाजीनगरचे आमदार अतुल सावे यांची देखील मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याचं दाट बोललं जात आहे.

News Title : Maharashtra Cabinet Expansion BJP Miniters Full List

महत्वाच्या बातम्या –

फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळात ‘या’ लाडक्या बहीणींना मंत्रिपदाची लॉटरी?

अवघ्या काही तासात राज्याला मिळणार नवे मंत्री; ‘या’ नेत्यांच्या नावांची चर्चा

ग्राहकांना सुखद धक्का! सोनं झालं स्वस्त, ‘इतक्या’ रुपयांनी उतरले भाव

मंत्रीपदासाठी भाजपकडून पहिला फोन नितेश राणेंना, अजून कुणाकुणाला फोन?

आज या’ राशींचं भाग्य खुलणार, राजकारणात लागणार मोठ्या पदाची लॉटरी

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now