भाजप अजितदादा-एकनाथ शिंदेंना देणार मोठा धक्का?, आतली बातमी समोर

On: December 13, 2024 10:44 AM
Maharashtra Cabinet Expansion big update 
---Advertisement---

Maharashtra Cabinet Expansion | 5 डिसेंबरला फडणवीस सरकारचा शपथविधी पार पडला. यानंतर सर्वांचं लक्ष आता मंत्रीमंडळ विस्तराकडे लागलं आहे. उद्या 14 डिसेंबररोजी मंत्रीमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, अजूनही खातेवाटप जाहीर झालेलं नाही. येत्या सोमवारपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार होणार आहे. आता यात कुणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. (Maharashtra Cabinet Expansion)

त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून ज्या खात्यावरून तिढा रंगला होता, त्या गृहखात्याबाबतही निर्णय झाला असल्याची माहिती समोर येत आहे. अर्थखातं आणि गृहखातं भाजप स्वत: कडे ठेवणार असल्याचं कळतंय. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांच्याकडे अर्थखाते होते. मात्र, भाजप अर्थखाते देखील आपल्याकडे ठेवणार असल्याचं बोललं जातंय.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपकडे 21 खाती, शिवसेना शिंदे गटाकडे 13, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 9 मंत्रीपदं जाणार आहेत. यात पहिल्या टप्प्यात 35 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. यामध्ये भाजपकडून 17, तर शिवसेना 10, आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 7 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास आणि महसूल खातं असणार आहे. तर अजित पवार यांच्याकडे गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम ही महत्त्वाची खाती जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. (Maharashtra Cabinet Expansion)

शिवसेना शिंदे गट संभाव्य यादी-

  1. उदय सामंत
  2. तानाजी सावंत
  3. शंभूराजे देसाई
  4. दादा भुसे
  5. गुलाबराव पाटील
  6. राजेश क्षीरसागर
  7. आशिष जैस्वाल
  8. प्रताप सरनाईक
  9. संजय शिरसाट
  10. भरत गोगावले (Maharashtra Cabinet Expansion)

राष्ट्रवादी (अजित पवार गट) संभाव्य यादी-

  1. आदिती तटकरे
  2. हसन मुश्रीफ
  3. छगन भुजबळ
  4. धनंजय मुंडे
  5. धर्मरावबाबा अत्राम
  6. अनिल पाटील
  7. दत्ता भरणे (Maharashtra Cabinet Expansion)

News Title – Maharashtra Cabinet Expansion big update 

महत्वाच्या बातम्या :

आज मार्गशीर्ष महिन्यातलं पहिलं प्रदोष व्रत, महादेव ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

पवारसाहेब आणि अजितदादा पुन्हा एकत्र येणार?

अजितदादांची धाकधूक वाढली! भाजप अजितदादांना देणार दे धक्का?

केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय! यापुढे ‘एक देश, एक निवडणूक’ …?

नवीन राजकीय समिकरणं जुळणार? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना फोन; ‘या’ विषयावर झालं बोलणं

Join WhatsApp Group

Join Now