अखेर मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात घेतला असा निर्णय?

On: December 11, 2024 11:47 AM
Maharashtra Politics
---Advertisement---

Maharashtra l राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळाल्याने राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे. मात्र यावेळी महायुतीमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने मुख्यमंत्रीपद देखील भाजपला मिळालं आहे. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर एकनाथ शिंदे अंडी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. मात्र आता या शपथविधीनंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न अद्यापही सुटलेला नाही.

मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न दिल्ली दरबारी? :

राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीच्या तिन्ही नेत्यांमध्ये मध्यरात्री दीड वाजता खलबते झाले. यावेळी तब्बल एक तास चाललेल्या या बैठकीत सुद्धा अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे आता मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय दिल्ली दरबारात जाणार असल्याचं बोललं जात आहे. कारण आज दुपारच्या सुमारास महायुतीचे तीनही प्रमुख नेते दिल्लीला रवाना होणार असल्याची माहिती मिळाली आहे.

यावेळी महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मेघदूत बंगल्यावर झालेल्या बैठकीत खातेवाटपासंदर्भात चर्चा झाली. मात्र या चर्चेतून अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे आता खातेवाटपाचा तिढा सुटत नसल्याने अखेर तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते दिल्लीला जाण्याची शक्यता आहे.

Maharashtra l कोणत्या पक्षाला किती मंत्रिपदं मिळणार? :

खातेवाटपावरून सुरु असलेल्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी हे तिन्ही प्रमुख नेते दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करणार आहेत. मात्र यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

याशिवाय एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 12 मंत्रीपदे तर भाजपला 20 ते 22 मंत्रिपदे मिळणार असल्याचं बोललं जात आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदे दिले जाणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

News Title – Maharashtra Cabinet Expansion

महत्वाच्या बातम्या-

‘पुष्पा 2’ चित्रपटासाठी अल्लू अर्जुनला मिळालं इतक्या कोटींचं मानधन!

राज्यातील ‘या’ जिल्ह्यात रक्त गोठवणारी थंडी, शाळांच्या वेळात मोठा बदल

मंत्रीपदासाठी इच्छुक व नाराजांसाठी एकनाथ शिंदे वापरणार ‘हा’ पॅटर्न?, चर्चेला उधाण

“माझं डोकं पिसाळलं तर…”; मनोज जरांगे संतापले, पण कुणावर?

मोक्षदा एकादशीला भगवान विष्णू व लक्ष्मी ‘या’ राशींवर ठेवणार कृपादृष्टी!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now