मविआचा राज्यातून सुपडासाफ?, एकट्या भाजपनेच गाठली शंभरीपार

On: November 23, 2024 11:05 AM
Maharashtra Assembly Results 2024
---Advertisement---

Maharashtra Assembly Results 2024 | आज 23 नोव्हेंबररोजी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. मतमोजणीला आता जवळपास 3 तास झाले असून यात महायुतीने राज्यात जोरदार आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. एकट्या भाजपनेच तब्बल 110 जागांवर आघाडी घेतली आहे. भाजपने 2014 मधील हा रेकॉर्ड आता मोडला आहे.त्यामुळे राज्याला आता भाजपचा मुख्यमंत्री मिळणार का, याबाबत चर्चा रंगत आहेत. (Maharashtra Assembly Results 2024 )

महायुतीमध्ये भाजप 110 जागा, एकनाथ शिंदे गट 49 जागा तर अजित पवार गट 34 जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला फक्त 83 जागांची आघाडी मिळाली आहे. यात कॉँग्रेस 26 जागा, उद्धव ठाकरे गट 30 जागा आणि राष्ट्रवादी शरद पवार गट हा 21 जागांवर आघाडी आहे.

भाजपला 111 जागांची आघाडी

मविआमधील बडे नेते सुद्धा सध्या पिछाडीवर दिसून येत आहेत. नाना पटोले, रोहित पवार हे पिछाडीवर दिसून येत आहे. तर,राज ठाकरे यांचा पक्ष मनसेने अद्याप भोपळा देखील फोडलेला नाही. आता हाती आलेल्या आकडेवारीनुसार, सर्व एक्झिट पोल राज्यात फेल ठरले आहेत. राज्यात भाजपाची त्सुनामी आल्याचे दिसून येत आहे.

भाजपा हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेते अजूनही पिछाडीवर असल्याने आता विरोधी पक्षाची माळ कोणत्या नेत्याच्या गळ्यात पडते, ते पाहणे देखील उत्सुकाचे ठरणार आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुती सरकार येणार, असं चित्र आता दिसून येत आहे. (Maharashtra Assembly Results 2024 )

News Title :  Maharashtra Assembly Results 2024

महत्वाच्या बातम्या – 

प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली गुड न्यूज, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘एक हाती सत्ता द्या’ म्हणणाऱ्या मनसेने अद्याप भोपळाही फोडला नाही?

निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच?, ‘हा’ नेता म्हणाला मुख्यमंत्री आमचाच

‘राज’पुत्र अमित ठाकरे आघाडीवर की पिछाडीवर?, माहीमचा निकाल पाहण्यासाठी ‘इथे’ क्लिक करा

परळीत धनंजय मुंडे जोमात, तब्बल ‘इतक्या’ हजार मतांनी घेतली आघाडी!

Join WhatsApp Group

Join Now