राज्यात विधानसभेला मेहुणे-मेव्हण्यात होणार टशन!

On: November 6, 2024 12:23 PM
Municipal Elections Reservation
---Advertisement---

Vidhansabha 2024 l विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक मोठ्या घडामोडी घडतं आहेत. अशातच आता राज्यात परभणी आणि बीड जिल्ह्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. कारण आता या दोन विधानसभा मतदारसंघात मेहुणे-मेव्हण्यात टशन पाहायला मिळत आहे.

मधुकर केंद्रे यांनी घेतली विरोधी भूमिका :

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात महायुती सरकारने रत्नाकर गुट्टे यांना पुरस्कृत केलं आहे. मात्र आता गुट्टे यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचे मेहुणे माजी आमदार डॉ.मधुकर केंद्रे यांनी घेतली आहे. याशिवाय माजी आमदार डॉ.मधुकर केंद्रे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत गुट्टे यांच्यावर हल्लाबोल देखील केला आहे. तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार विशाल कदम यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

गंगाखेड विधानसभा मतदारसंघात रत्नाकर गुट्टे यांच्याविरोधात मधुकर केंद्रे यांनी विरोधाची भूमिका घेतल्यानंतर त्याचे पडसाद देखील परळीमध्ये उमटू लागले आहेत. त्यामुळे आता परळी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार कृषी मंत्री धनंजय मुंडे हे विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांच्यात चुरशीची लढत होणार आहे.

Vidhansabha 2024 l आरोप-प्रत्यारोपामुळे निवडणुकीच्या प्रचारात रंगत :

रत्नाकर गुट्टे यांचे जावई राजेभाऊ फड यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी न मिळाल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून विधानसभा अर्ज भरला होता. मात्र आता राजेभाऊ फड यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात प्रचार करणार आहे.

तसेच विधानसभा निवडणुकीच्या महासंग्रामात प्रचारात महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवर निशाणा साधत असताना गंगाखेड आणि परळीतील मेव्हुण्या मेव्हुण्यातील आरोप-प्रत्यारोपामुळे निवडणुकीच्या प्रचारात रंगत आली आहे.

News Title : Maharashtra Assembly Elections 2024

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यातील ‘या’ भागात बरसणार पाऊस; IMD चा इशारा

राहुल गांधी करणार 5 गेमचेंजर घोषणा, मविआच्या गॅरंटीत कोणते मुद्दे?

भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, ‘या’ नेत्यांची तडकाफडकी हकालपट्टी

“भारत देश जितका कपाळावर टिळा लावणाऱ्यांचा, तितकाच दाढीवाल्यांचाही”

लाडक्या बहीणींना महिन्याला मिळणार 2100 रुपये?, मुख्यमंत्री शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now