मुख्यमंत्री अन् दोन उपमुख्यमंत्रिपदाचा पॅटर्न कायम राहणार का?

On: November 24, 2024 11:22 AM
Cabinet Ministry Formula
---Advertisement---

Maharashtra l महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल काल जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महायुतीने सर्वाधिक जागा मिळवून विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये महायुतीचंच सरकार आलं हे जवळपास निश्चितच झालं आहे. परंतु, आता सर्वांना प्रश्न पडला आहे की, राज्याचा मुख्यमनातरी कोण होणार? तर आता यासंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा पॅटर्न कायम राहणार? :

निकालानंतर महाराष्ट्रात महायुतीमध्ये मुख्यमंत्रिपदाचा चेहरा हा भाजप पक्षाचा असणार अशी माहिती मिळाली आहे. याशिवाय राज्यात एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा पॅटर्न हा कायम राहणार असल्याचं देखील बोललं जात आहे. त्यामुळे आता महायुती सरकारच्या तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांकडे प्रमुख पदं कायम राहणार असल्याचं दिसून येत आहेत.

याशिवाय सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा भाजप पक्षाचा असेल. कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना देखील सत्तेत योग्य सन्मान दिला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री पदाची शपथ कोण घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Maharashtra l शपथविधी सोहळा कधी होणार? :

महायुतीच्या या अभूतपूर्व विजयामध्ये भाजपला आतापर्यंत सर्वात मोठं यश मिळालं आहे. कारण या विधानसभेत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. तसेच यावेळी महाविकास आघाडीला 50 चा आकडा गाठणं देखील मुश्कील झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

तर यावेळी महायुतीनं तब्बल 236 जागा जिंकल्या आहेत. अशातच आता उद्या शपथविधी सोहळा पार पडणार आहे. यावेळी मुंबईतील वानखेडे मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण 26 तारखेला विधानसभेचा कार्यकाळ संपत असल्यानं एक दिवस आधीच राज्यात स्थापन केलं जाणार असल्याचं समजत आहे.

News Title – Maharashtra Assembly Election Results 2024

महत्त्वाच्या बातम्या-

विधानसभा निकालाविरोधात न्यायालयात जाणार?, ‘त्या’ पोस्टने खळबळ

पवार vs पवार सामना झालेल्या ‘त्या’ 40 जागांचा निकाल काय लागला?

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?, पाहा संपूर्ण आकडेवारी

आज ‘या’ राशींना मिळणार भाग्याची साथ, देवी लक्ष्मी आर्थिक अडचणी करणार दूर!

मोठी बातमी! अटीतटीच्या लढतीमध्ये रोहित पवार विजयी, राम शिंदेंचा ‘इतक्या’ मतांनी पराभव

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now