निवडणूक होताच शेतकऱ्यांना सर्वात मोठा झटका!

On: November 25, 2024 1:52 PM
Maharashtra
---Advertisement---

Farmer l विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना धक्का देणारी बातमी समोर आली आहे. दूध संघाने गाईच्या दुधाच्या दरात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे आता दूध उत्पादक शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. मात्र दुधाचे दर कमी करण्यामागचे कारण काय आहे हे आपण पाहुयात…

गाईच्या दुधाचे दर कमी झाले :

अतिरिक्त दूध उत्पादनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यातील दूध संघाने हा दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. तसेच दुग्ध व्यवसाय हा महाराष्ट्रातील शेतीशी संबंधित जोडव्यवसाय असल्याने या फटका थेट शेतकऱ्यांना बसणार आहे.

यासंदर्भात दूध संघटनेच्या कोल्हापूर विभागातील डेअरी प्रमुखांची बैठक पार पडली आहे. या बैठकी दरम्यान हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच खाजगी व सहकारी दूध संघाचा गाय दूध खरेदी दर प्रतिलिटर हा 30 रुपये करण्यात आला आहे.

Farmer l निर्णय का घेतला? :

या बैठकीत दूध भुकटी, लोणी, दुधाचे बाजारातील खरेदी व विक्रीचे दर याबाबत देखील चर्चा झाली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा ऑक्टोबरपासून गाय दूध खरेदीचा 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ करीता किमान प्रतिलिटर दर हा 28 रुपये असणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण महाराष्ट्रात इतर संघ 27 ते 28 रुपये या दराने गाय दूध खरेदी करत आहेत.

फक्त कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक दर आहे. तर आता कोल्हापूरमध्ये 33 रुपये दर असणार आहे. त्यामुळे लोणी, दूध भुकटी याचा खर्च जास्त असल्याने बाजारामध्ये त्याची स्पर्धात्मक दराने विक्री करू शकत नाही. तसेच सध्या स्थितीत गाय व म्हैस दूध जास्त प्रमाणात उपलब्ध आहे.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

News Title – Maharashtra Assembly Election Big Blow To Farmers

महत्त्वाच्या बातम्या-

…तर त्यावेळी माझी चूक झाली; अजित पवार नेमकं काय म्हणाले?

‘अरे ढाण्या थोडक्यात वाचलास’, अन् रोहित पवार अजितदादांच्या पायाच पडले; पाहा Video

मी कटाचा बळी ठरलो; राम शिंदेंचा खळबळजनक आरोप

पराभव जिव्हारी लागला; काँग्रेसचा बडा नेता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यातील ‘या’ 20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now