महाराष्ट्रातील आणखी एका कंपनीचा गुजरातकडे जाण्याच्या मार्ग मोकळा!

On: February 22, 2024 12:32 PM
Mahanand dairy
---Advertisement---

Mahanand Dairy Project | राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातला नेले आहेत. मुंबईतील डायमंड प्रकल्प गुजरातला नेले होते. तसेच वेदांता प्रकल्प देखील गुजरातला नेला असून रोजगाराच्या संधीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. कोकणातील सिंधुदूर्गमध्ये एक पाणबुडीचा प्रकल्प आला होता तो देखील गुजरातला वळवून घेतल्याने महाराष्ट्राच्या पदरी निराशा असल्याचं राज्यातील विरोधक सत्ताधाऱ्यांना जाब विचारत आहेत. अशामध्ये आणखी एका प्रकल्पाची भर पडली आहे. तो प्रकल्प म्हणजे महानंद डेअरी. (Mahanand Dairy Project)

महानंद डेअऱी (Mahanand Dairy Project) आता गुजरातला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक प्रकल्पानंतर आता महानंद डेअरीचा नंबर लागला असल्याचं समजतंय. यावर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली आहे. त्यांनी आपल्या ‘x‘ अकाऊंटवर टीकेची तोफ डागली आहे.

काय म्हणाले आव्हाड?

“मुद्दामहून रात्री ट्वीट करीत आहे. उद्या सकाळीच महानंद डेअरीत जा, डेअरीतून दूध विकत घ्या.. देवाला दुधाचा अभिषेक करा, गोड शिरा करा, जेवढं शक्य असेल तेव्हढं गोडधोडही करा… आता हे काय नवीन सांगतो आहे, असं म्हणाल ! हे सांगण्याचं कारण म्हणजे, महानंद आता गुजरातला विकलेय ! जय हो, महानंद की !”, असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

महाराष्ट्र सहकारी दूध महासंघ महानंदाचा कारभार गुजरात एनडीडीबीतून चालवणार आहे. हा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. संचालक मंडळाचा हा प्रस्ताव राज्य सरकारकडे याआधी पाठवला आहे. याला आता सरकारकडून मंजूरी मिळाल्यास कारभार एनडीडीबीतून मिळणार आहे.

एनडीडीबीचे कार्यालय हे गुजरामध्ये आहे. यामुळे महानंद प्रकल्प हा गुजरातला गेल्यानंतर एनडीडीबी त्यांचे संचालन करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. महानंदाप्रमाणे देशातून आणि राज्यातून अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत.

महानंदच्या चेअरमनकडून राजीनामा

महानंदचे चेअरमन राजेश पराजणेंसह संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य एनडीडीबीकडे जाणार असल्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सहकारी दूध महासंघ व्यवस्थापकीय संचालकांकडे राजीनामा देण्यात आला आहे.

News Title – Mahanand Dairy Project news Update

महत्त्वाच्या बातम्या

बॉलिवूडमधील आणखी एका कपलमध्ये मतभेद?, घटस्फोट घेणार?

अजय महाराज बारस्कर यांच्याबद्दल धक्कादायक माहिती समोर!

अजिंक्य रहाणेच्या घरी आली आलिशान कार; किंमत जाणून बसेल धक्का

लोकसभा निवडणूक: निवडणूक आयोगाने शुभमन गिलवर सोपवली मोठी जबाबदारी!

मंदिरावरही लागणार ‘कर’, ‘हिंदूविरोधी’ म्हणत काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली!

Join WhatsApp Group

Join Now