राजकारणात मोठा ट्विस्ट; ‘हा’ बडा नेता महायुतीतून बाहेर

On: October 16, 2024 5:41 PM
Maharashtra
---Advertisement---

Mahayuti | विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होताच महायुतीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्वेसर्वा महादेव जानकर यांनी टोकाचा निर्णय घेतला आहे. महादेव जानकर यांनी थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

महादेव जानकर महायुतीतून बाहेर

महादेव जानकर हे महायुतीमध्ये (Mahayuti) नाराज असल्याची माहिती आहे. महायुतीकडे विधानसभेसाठी त्यांनी 40 ते 50 जागांची मागणी केली होती. पण त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर त्यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. महादेव जानकर हे राज्यातील विधानसभेच्या सर्व 288 जागा लढवण्यावर ठाम आहेत. ते प्रत्येक मतदारसंघात उमेदवार उभे करणार आहेत.

राज्यातील 200 मतदारसंघामध्ये प्रत्येक जागेसाठी तीन-तीन अर्ज आले आहेत. आता फक्त 88 जागा राहिल्या आहेत. काही ठिकाणी आम्ही विजयी होऊ, काही ठिकाणी दोन नंबरची मतं घेऊ. काही ठिकाणी 10 हजारांपेक्षा जास्त मतं घेऊ, असंही जाणकर म्हणालेत.

Mahayuti | “आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे”

लोकसभेला महायुतीने आम्हाला एक जागा दिली होती. पण आमचा पक्ष मोठा झाला पाहिजे, आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे यासाठी आम्ही तयारी करत आहोत. आपल्याशी महायुती किंवा महाविकास आघाडीने संपर्क साधला नसून आपण आपल्या पक्षाच्या वाढीसाठी हा निर्णय घेतला आहे, असं जाणकरांनी सांगितलं आहे.

जानकर यांनी महायुतीला सोडचिठ्ठी देणं हे महायुतीला डोकेदुखी ठरु शकतं. त्यामुळे जातीय समीकरणांचा विचार करता भाजपला महादेव जानकर यांची मनधरणी करण्यात यश येतं का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“त्या 24 तास तुमच्या बरोबर असतात म्हणून…”; राष्ट्रवादीचा नेता भडकला

पुन्हा सत्ता आल्यास बहिणींना 3 हजार रुपये देणार; ‘या’ मंत्र्याचं आश्वासन

लॉरेन्स बिश्नोईच्या प्रेमाचा भयानक अंत, गर्लफ्रेंडमुळे बनला गँगस्टर

मी जे बोलतो ते करतो…; मराठा समाजाला मी स्वत: आरक्षण देणार

मोदी सरकारकडून कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now