आजपासून महाकुंभ मेळ्याला सुरवात! जाणून घ्या शाही स्नानाच्या तिथी

On: January 13, 2025 11:59 AM
Maha Kumbh 2025
---Advertisement---

Maha Kumbh 2025 l हिंदू धर्मात महाकुंभमेळ्याला मोठं महत्त्व आहे. कारण जगातील सर्वात मोठ्या धार्मिक कार्यक्रमांपैकी एक महाकुंभ मेळा आहे. आजपासून म्हणजेच 13 जानेवारीपासून या महाकुंभ मेळ्याला सुरवात झाली आहे. तर हा महाकुंभ मेळा 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत असणार आहे. यंदाच्या वर्षी उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे महाकुंभ मेळा आयोजित करण्यात आला आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती हा तीन नद्यांचा पवित्र संगम असलेल्या प्रयागराजमध्ये अनेक भाविक देवाचे आशीर्वाद घेण्यासाठी या मेळ्याला उपस्थित राहतात.

पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा :

प्रयागराजमध्ये सुरु झालेल्या या महाकुंभ मेळाव्यासाठी तब्बल 45 हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. तसेच या मेळाव्यासाठी साधू-संत, भाविक याशिवाय परदेशातील व्यक्ती देखील सहभागी होणार आहेत, त्यामुळे यंदाच्या वर्षी सुरक्षेसाठी 55 हून अधिक फोर्स असणार आहेत.

आजपासून सुरु झालेल्या महाकुंभ मेळ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरद्वारे ट्वीट करत शुभेच्छा देखील दिल्या आहेत. “भारतीय मूल्ये आणि संस्कृती जपणाऱ्या कोट्यवधी लोकांसाठी हा एक अत्यंत खास दिवस आहे. कारण आजपासून प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा सुरू होत आहे. हा महाकुंभ मेळा असंख्य लोकांना श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीच्या पवित्र संगमात एकत्र आणतो. हा महाकुंभ भारताच्या आध्यात्मिक वारशाचं प्रतीक आहे”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Maha Kumbh 2025 l महाकुंभ 2025 च्या शाही स्नानाची तिथी! :

पौष पौर्णिमा – 13 जानेवारी 2025
मकर संक्रांती – 14 जानेवारी 2025
मौनी अमावस्या – 29 जानेवारी 2025
वसंत पंचमी – 3 फेब्रुवारी 2025
माघ पौर्णिमा – 12 फेब्रुवारी 2025
महाशिवरात्री – 26 फेब्रुवारी 2025

News Title : Maha Kumbh 2025

महत्वाच्या बातम्या –

सरपंच हत्या प्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक, केल्या ‘या’ मोठ्या मागण्या?

आज नवपंचम योगामुळे ‘या’ राशींचे लोक यशस्वी होणार!

सरपंच हत्या प्रकरणात महत्वाची अपडेट, वाल्मिक कराडविरोधात मोठी कारवाई

कृषीमंत्री जवळचे सांगत शेतकऱ्यांची फसवणूक, वाल्मिक कराडचा आणखी एक कारनामा उघड

परळीत आणखी एका सरपंचचा मृत्यू, सर्वत्र एकच खळबळ

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now