Madha Vidhansabha | महाविकास आघाडीसह महायुतीमधील माढ्याच्या उमेदवारीसाठी सुरू असलेला संघर्ष अखेर संपला आहे. शरद पवारांनी माढ्यात धक्कातंत्र देत यंदा साखर कारखानदार अभिजीत पाटील (Abhijit patil) यांना विधानसभेचं तिकीट दिलंय. तर, महायुतीमध्ये ही जागा अजित पवार गटाच्या वाट्याला आली आहे. अजित पवार यांनी येथील उमेदवार जाहीर केलाय. (Madha Vidhansabha)
माढ्याच्या नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या नेत्या अॅड. मिनल साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उमेदवारी मिळवली आहे. मिनल साठे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र, पवारांनी येथे अभिजीत पाटील यांच्यावर विश्वास टाकला. त्यामुळे मिनल साठे यांनी अजित पवार गटाकडून तिकीट मिळवलं आहे.
अजित पवारांनी दिला उमेदवार
याच जागेवर अजित पवार गटाचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे इच्छुक होते. उमेदवारीसाठी त्यांनी गेले आठ दिवस शरद पवारांकडे प्रयत्न केले. मात्र, अभिजीत पाटलांनी उमेदवारी मिळवण्यात मात केल्याचं दिसून आलं. बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी देखील शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांनाही येथे डावलण्यात आलं. आता रणजित शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.
त्यामुळे माढ्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आता वर्तवली जात आहे. शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत पाटील यांनी तिकीट मिळताच मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. माढामध्ये शरद पवार पुन्हा एकदा मराठा कार्ड खेळणार, अशा चर्चा यामुळे रंगत आहेत. लोकसभेत जरांगे इफेक्टमुळे माढा विधानसभेतून महायुतीच्या उमेदवारला 55 हजार मतांची पिछाडी मिळाली होती.आता येथे पुन्हा एकदा जरांगे इफेक्टसाठी शरद पवार प्रयत्न करत असल्याचं बोललं जातंय. (Madha Vidhansabha)
महायुतीच्या उमेदवार मिनल साठे कोण आहेत?
मिनल साठे या सध्या माढा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा आहेत.याशिवाय त्या माढा तालुक्याचे माजी आमदार धनाजीराव साठे यांच्या सून आहेत. गेल्या अनेक वर्षापासून त्या काँग्रेस पक्षाचे काम करत होत्या. मात्र, आता विधानसभा निवडणुकीसाठी त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून निवडणुकीत उतरल्या आहेत. (Madha Vidhansabha)
News Title – Madha Vidhansabha mahayuti candidate Minal Sathe
महत्त्वाच्या बातम्या-
लक्ष्मी पावली! धनत्रयोदशीला सोनं झालं स्वस्त, जाणून घ्या 10 ग्रॅमचे भाव
“शूटिंग सुरु असताना मी सलमानला बाजूला घेऊन गेले आणि”,’या’ अभिनेत्रीकडून धक्कादायक खुलासा
शरद पवार गटाचे आणखी 5 उमेदवार विधानसभेच्या रिंगणात, कोणाकोणाला मिळाली संधी?
महायुतीत भाजपच ठरला मोठा भाऊ?, उमेदवारांची चौथी यादीही जाहीर
निवडणुकीच्या काळात झिशान सिद्दीकींच टेन्शन वाढवणारी बातमी समोर!






