सर्वसामान्यांना महागाईचा झटका; गॅस सिलेंडर ‘इतक्या’ रुपयांनी महागला

On: December 1, 2024 12:03 PM
LPG Cylinder
---Advertisement---

LPG Cylinder l विधानसभा निवडणूक पार पडताच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. कारण दार महिन्याच्या 1 तारखेला काही बदल होत असतात. अशातच गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्यामुळे आता वर्षाअखेरीस ग्राहकांना गॅस सिलेंडरचा झटका बसला आहे. महत्वाची बाब म्हणजे यावेळी व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली आहे. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झाला नाही.

घरगुती गॅस सिलेंडरचा दर काय? :

तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस म्हणजेच 19 किलोच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. तर घरगुती एलपीजी सिलेंडरच्याम्हणजेच 14.2 किलो किंमतीच्या गॅस सिलेंडरमध्ये कोणताही बदल झालेला नाही. गेल्या कित्येक महिन्यांपासून घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. तर काही महिन्यांपूर्वी घरगुती गॅसवर सबसिडी देखील जाहीर केली होती. त्यामुळे आता 1100 रुपयांच्या घरात मिळणारा सिलेंडर हा 800 ते 900 रुपयांदरम्यान मिळत आहे.

मात्र आता दिल्लीत घरगुती गॅसची किंमत 803 रुपये आहे. तर कोलकत्त्यात 829 रुपये आणि मुंबईत हा दर 802.50 रुपये आहे. अशातच आता उज्ज्वला सिलेंडर योजनेतील ग्राहकांना सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी देखील देण्यात येत आहे.

LPG Cylinder l गॅस किती रुपयांनी वाढला? :

याशिवाय तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सलग पाचव्यांदा ही दरवाढ करण्यात आली आहे. मात्र यावेळी 19 किलो व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती 16.50 रुपयांनी वाढल्या आहेत.

या दरवाढीनंतर देशातील चार प्रमुख शहरातील व्यावसायिकांना आता अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. त्यानुसार, दिल्लीमध्ये गॅस सिलेंडर आता 1818.50 रुपयांना मिळत आहे. तर मुंबईत 1771 रुपये, कोलकत्तामध्ये 1927 रुपये आणि चेन्नईमध्ये 1980 रुपयांना गॅस सिलेंडर मिळत आहे. या दरवाढीमुळे हॉटेलिंग देखील महाग होणार आहे. खाद्यपदार्थांसाठी जादा किंमत मोजावी लागू शकते.

News Title : LPG Cylinder Price Hike

महत्त्वाच्या बातम्या- 

महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांची पहिली यादी समोर! कोणाला लागणार लॉटरी?

“नकोच ते राजकारण”; दिलीप वळसे पाटलांच्या मुलीची पोस्ट चर्चेत

मुंबई व ठाण्यात ‘इतके’ दिवस पाणीपुरवठा बंद राहणार

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तब्येतीबाबत मोठी अपडेट समोर!

जनतेचा कौल 5 महिन्यांत बदलला, आम्ही काय करणार?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now