LPG Cylinder Blast | स्वयंपाकासाठी ग्रामीण भागात पूर्वी मोठ्या प्रमाणावर लाकडी चुलींचा वापर केला जात होता. या धुरामुळे महिलांच्या आरोग्याला गंभीर तक्रारी निर्माण होत असत. यावर उपाय म्हणून सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सुरू केली आणि गरजू महिलांना मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध करून दिले. अलीकडेच या योजनेचा दुसरा टप्पा सुरू झाला असून देशभरातील आणखी 25 लाख महिलांना मोफत गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे.
उज्ज्वला योजनेमुळे एलपीजी गॅसचा (LPG Gas) वापर झपाट्याने वाढला आहे. यामुळे महिलांचे आरोग्य सुरक्षित झाले असून आता गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, गॅस सिलेंडर सुरक्षित असले तरी काहीवेळा तांत्रिक बिघाड किंवा निष्काळजीपणामुळे सिलेंडरचा स्फोट होतो आणि यात गंभीर जीवितहानी होते. (LPG Accident Compensation)
गॅस सिलेंडर अपघातासाठी किती मिळते नुकसान भरपाई? :
एलपीजी गॅस सिलेंडर अपघातांसाठी सार्वजनिक विमा काढण्यात आलेला असतो. हा विमा थेट ग्राहकांच्या नावावर नसून तेल कंपन्यांकडून काढलेला असतो. या अंतर्गत सिलेंडर स्फोटामुळे जीवितहानी झाल्यास प्रति व्यक्ती 6 लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळते. तसेच, वैद्यकीय खर्चासाठी प्रति व्यक्ती 2 लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाते.
याशिवाय, एका अपघातासाठी एकूण 30 लाख रुपयांपर्यंतची भरपाई मंजूर होऊ शकते. ग्राहकांच्या नोंदणीकृत पत्त्यावर झालेल्या संपत्तीच्या नुकसानीसाठी 2 लाख रुपयांपर्यंतची भरपाई उपलब्ध आहे. एका वर्षात जास्तीत जास्त 10 कोटी रुपयांचा विमा कव्हर दिला जातो.
LPG Cylinder Blast | नुकसान भरपाईसाठी प्रक्रिया कशी करावी? :
सिलेंडर स्फोटासारखा अपघात झाल्यानंतर ग्राहकांनी तात्काळ आपल्या गॅस डिस्ट्रीब्यूटरला माहिती द्यावी लागते. त्यानंतर पुढील प्रक्रिया तेल कंपनी आणि विमा कंपनीकडून केली जाते. ग्राहकांना थेट विमा कंपनीशी संपर्क साधण्याची गरज नसते. (LPG Customer Benefits)
फक्त अपघातानंतर मृत्यू प्रमाणपत्र किंवा वैद्यकीय खर्चाची बिले गॅस वितरकाकडे जमा करावी लागतात. त्यानंतर नुकसान भरपाईची संपूर्ण प्रक्रिया वितरक व संबंधित कंपनीकडून पार पाडली जाते.






