‘सरकारमध्ये येणार पण..’;चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांचं BJP वर दबावतंत्र, केली मोठी मागणी

Lok Sabha Election | काल 4 जूनरोजी जगातील सर्वांत मोठ्या लोकशाही देशातील निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत अनपेक्षित असा निकाल लागला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 400 पारचा नारा देणाऱ्या भाजपला मात्र 240 जागांवर समाधान मानावं लागलं.

मागील 10 वर्षात भाजपला बहुमतापेक्षा कमी संख्याबळ मिळाले आहे. त्यामुळे आता केंद्रात सलग तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन करण्यात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) आणि टीडीपीचे सर्वेसर्वा चंद्राबाबू नायडू ( N. Chandrababu Naidu) यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

लोकसभा अध्यक्षपदासाठी मागणी?

दुसरीकडे इंडिया आघाडीला देखील 232 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे इंडिया आघाडी देखील सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे. भाजपला सरकार स्थापन करण्यासाठी मित्र पक्षांची गरज भासणार आहे. तर, इंडिया आघाडी सुद्धा पाठिंबा मिळवण्यात प्रयत्नशील असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

अशात नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची (Lok Sabha Election)भूमिका अत्यंत परिणामकारक ठरणार आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार, नितीशकुमार आणि चंद्राबाबू यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदावर दावा केला असल्याची माहिती समोर येत आहे.

भाजप काय भूमिका घेणार?

भविष्यात संभाव्य पक्ष फुटीपासून आघाडीतील मित्र पक्षांना वाचवण्यासाठी दोन्ही पक्षांनी हे पाऊल उचलल्याची जोरदार चर्चा आहे.कारण, पक्षांतरविरोधी कायद्यात सभापतींची भूमिका महत्त्वाची असते.आता भाजप यावर काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अटलबिहारी वाजपेयी यांच्या (Lok Sabha Election) कार्यकाळात केंद्रात भाजपची सत्ता असताना लोकसभेचे अध्यक्षपद हे मित्रपक्षांना देण्यात आले होते.मात्र, मोदी सत्तेत असताना मित्रपक्षांना अध्यक्षपद देण्यात आले नव्हते.आता नितीशकुमार आणि चंद्राबाबू यांनी याच पदासाठी भाजपवर दबाव टाकल्याचं म्हटलं जातंय.

News Title :  Lok Sabha Election NDA TDP JDU 

महत्त्वाच्या बातम्या- 

एकनाथ शिंदेंचे अनेक खासदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात?

घरच्या आमदारानं केला शशिकांत शिंदेंचा घात, अशी पडली साताऱ्यात जागा!

दारुण पराभवानंतर राजू शेट्टी यांनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टनं खळबळ

संविधान वाचवण्यासाठी ‘या’ नेत्यांनी एकत्रित यावे; बड्या नेत्याचं विधान

महाराष्ट्रातील सर्वच्या सर्व 48 जागांचा निकाल वाचा एकाच ठिकाणी