पुण्यातील लोहगाव, शिवाजीनगरच्या नागरिकांसाठी महत्त्वाची माहिती, हवामान खात्याचा इशारा

On: April 10, 2025 2:04 PM
lohegaon news
---Advertisement---

Lohegaon News | पुणे शहरात एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाची प्रचंड तीव्रता जाणवू लागली आहे. सलग काही दिवस शहर व उपनगरांमध्ये चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान पोहोचल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असून, उन्हामुळे बाहेर पडणे कठीण बनले आहे.

तापमानात झपाट्याने वाढ-

पुणेकरांना गेले तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा अनुभव येत आहे. विशेषतः बुधवारी लोहगावमध्ये (Lohegaon News)  तापमान ४२.२ अंश सेल्सिअसवर पोहोचले, तर शिवाजीनगरमध्ये ४०.७ अंश नोंदवले गेले. याआधी सोमवारी शहरात ४१.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, जे हंगामातील सर्वाधिक होते.

मंगळवारी देखील उन्हाची तीव्रता तेवढीच होती आणि बुधवारी दुपारी बारानंतरही सूर्याचा चटका अधिक जाणवला. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील दोन दिवसांमध्येही असाच उकाडा कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी (Lohegaon News) शक्यतो दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, असा सल्ला दिला आहे.

उन्हाच्या तडाख्यातून बचाव करण्यासाठी उपाय आवश्यक

अतिउष्णतेमुळे शरीरातील पाण्याची कमतरता होऊन डिहायड्रेशन, उष्माघात, घामोळे, चक्कर येणे अशा त्रासांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून दररोज किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्यावे.

ताप, घाम न येणे, उलट्या होणे, थकवा आणि चक्कर यासारख्या लक्षणांची जाणीव झाल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. उन्हात घराबाहेर पडताना टोपी, गॉगल, स्कार्फ, सनस्क्रिन यांचा वापर करावा. याशिवाय नारळपाणी, ताक, लिंबूपाणी यांसारखी घरगुती पेये घेण्याचा सल्लाही दिला जात आहे. झोपेचीही काळजी घेणे गरजेचे आहे.

News Title- lohegaon and shivajinagar Mercury Crosses 42°C

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now