लाडकी बहीण योजनेचा सर्वात मोठा फटका शेतकऱ्यांना; स्वतः कृषिमंत्र्यांनी दिली कबुली

On: January 5, 2025 12:35 PM
Manikrao Kokate लाडकी बहीण योजना
---Advertisement---

Pune – विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र, ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर ताण आल्याची कबुली कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर चार-सहा महिन्यांनी राज्य सरकार शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले. (मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना)

शेतात मजूर मिळेनासे झाले-

‘लाडक्या बहीण’ योजनेमुळे शेतांमध्ये मजूर मिळत नसल्याची तक्रार होत असून, आता पुरुषांनीच शेतांमध्ये काम करावे, असा अजब सल्लाही कोकाटे यांनी दिला आहे. कृषी मंत्रिपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कोकाटे यांनी पुण्यात कृषी विभाग व विद्यापीठांचा आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

राज्य व केंद्राच्या योजनांचा एकत्रित लाभ-

ते म्हणाले, राज्य व केंद्र सरकारच्या योजनांचा एकत्रित लाभ देण्यासाठी कृषी विभागाकडून एक स्वतंत्र पोर्टल तयार केले जाईल. यासाठी एका समितीची स्थापना करण्याचे आदेश देण्यात आले असून, येत्या तीन महिन्यात हे पोर्टल त्रयस्थ कंपनीकडून तयार करण्यात येईल. जेणेकरून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करण्याची गरज भासणार नाही.

कृषी विभागात समन्वयाचा अभाव-

कृषी विभागातील काही ठिकाणी समन्वयाचा अभाव असून तो दूर करण्यासाठी कृषी विभागात पुन्हा एकदा एक खिडकी योजना राबविण्याचा मानस आहे. त्यासाठी सर्व संबंधितांशी चर्चा करणार आहोत. पीकविमा संदर्भातला अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र, अशा बनावट अर्जदाराला निश्चित कारवाई करण्यात येईल.

जिल्हाधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचे अधिकार-

अशा प्रकरणांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना गुन्हे दाखल करण्याचे अधिकार असून त्यांना तसे निर्देश देण्यात येतील. कृषी विभागाच्या योजनांचा खर्च पाहता शेतकऱ्यांना किती लाभ मिळतो हे पाहण्याची गरज असून, यामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांची उत्पादकता वाढविण्यावर भर

विभागातील अनावश्यक बाबींवरील खर्च टाळून शेतकऱ्यांची उत्पादकता कशी वाढेल याकडे लक्ष देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

News Title: Loan waiver to farmers still a distant dream because of ladki bahin yojana

महत्त्वाच्या बातम्या-

रिक्षाचालकांसाठी अत्यंत महत्त्वाचा नियम लागू; …नाहीतर परवाना होणार रद्द!

उर्वशी रौतेलाचा थर्टी फर्स्ट जोरदार; फक्त एक परफॉरमन्स आणि घेतले इतके कोटी रुपये

“हॅलो, मी आईची हत्या केली आहे”; ‘त्या’ एका कॉलमुळे आख्खी मुंबई हादरली

धक्कादायक! ‘आरोपींनी संतोष देशमुख यांचा खून एन्जॉय केला?’, पोलिसांचा गौप्यस्फोट

“अजितदादा क्या हुँआ तेरा वादा…”; आकाच्या आकाची जेलवारी निश्चितच!

Krishna Varpe

Mahesh Patil

Join WhatsApp Group

Join Now