लिव्हर निकामी होण्याची ‘ही’ आहेत गंभीर लक्षणे; दुर्लक्ष केल्यास जीवावर बेतू शकते!

On: January 30, 2025 11:19 AM
Liver Failure Symptoms
---Advertisement---

Liver Failure Symptoms | निरोगी आरोग्यासाठी शरीरातील प्रत्येक अवयव निरोगी असणे आवश्यक आहे. त्यातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे यकृत (Liver). यकृताचे कार्य बिघडल्यानंतर संपूर्ण शरीराचे कार्य बिघडते. शरीर सामान्यपणे निरोगी ठेवण्यासाठी यकृत अतिशय महत्त्वाचे आहे. यकृताचे कार्य बिघडल्यानंतर शरीर काम करणे थांबवते. त्यामुळे दैनंदिन आहारात खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देऊन आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी. मात्र हल्लीच्या बिघडलेल्या जीवनशैलीचा (Lifestyle) परिणाम शारीरिक (Physical) आणि मानसिक (Mental) आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप (Insufficient Sleep), तणावपूर्ण जीवन (Stressful Life), बिघडलेले मानसिक आरोग्य इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम लगेच आरोग्यावर दिसून येतो. (Liver Failure Symptoms)

यकृताचे आरोग्य बिघडल्यानंतर अनेक शारीरिक समस्या (Health Problems) उद्भवू लागतात. मात्र काही लोक या समस्यांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे मृत्यू (Death) होण्याची शक्यता असते. यकृताचे कार्य थांबल्यानंतर आरोग्याला हानी पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला यकृताचे कार्य थांबल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे (Symptoms) दिसू लागतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

पोटात वेदना आणि सूज (Stomach Pain and Swelling)

यकृताचे कार्य बिघडल्यानंतर पोटाला सूज येण्यास सुरुवात होते. ज्यामुळे पोटात वेदना (Stomach Ache) होऊ लागतात. या वेदना अनेकदा असह्य असतात, त्यामुळे तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. लिव्हरला सूज (Swelling) आल्यानंतर पोटाच्या आजूबाजूला दुखण्यास सुरुवात होते. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

मलमूत्राच्या रंगात बदल (Change in Color of Stool and Urine)

स्टूलचा रंग बदलणे: स्टूलचा (Stool) रंग बदलणे हे लिव्हरच्या आजाराचे (Liver Disease) गंभीर लक्षण आहे. या लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. लिव्हरचे कार्य बिघडल्यानंतर किंवा थांबल्यानंतर स्टूलमध्ये जास्त पिवळसर (Yellowish) रंग येतो, जे आरोग्यासाठी अतिशय घातक (Harmful) आहे.
लघवीचा रंग बदलणे: लिव्हरची कार्यक्षमता कमी झाल्यानंतर स्टूलप्रमाणे लघवीचा (Urine) रंग सुद्धा बदलू लागतो, जे आरोग्यासाठी धोकादायक (Dangerous) आहे. अशावेळी लघवी आधीपेक्षा जास्त गडद रंगाची (Dark Color) दिसू लागते. याशिवाय लघवीमध्ये पिवळा रंग दिसून येतो. अशा दोन्ही स्थितीमध्ये यकृताचे कार्य थांबल्याची लक्षणे दिसून येतात.
त्वचेला खाज सुटणे (Itching)
दैनंदिन जीवन जगताना त्वचेला खाज सुटणे ही सामान्य समस्या आहे. मात्र अनेकदा हीच सामान्य समस्या पुढे जाऊन मोठी होण्याची शक्यता असते. लिव्हरसंबंधित समस्या (Liver Problems) उद्भवू लागल्यानंतर त्वचेला अधिक खाज येण्यास सुरुवात होते. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध उपचार करावे. (Liver Failure Symptoms)

वरीलपैकी कोणतीही लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यकृताचे आरोग्य राखण्यासाठी सकस आहार, पुरेशी झोप आणि नियमित व्यायाम करणे महत्त्वाचे आहे.

 Title : Liver Failure Symptoms

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now