LIC ने सादर केल्या दोन भन्नाट योजना; या लोकांना मिळणार खास सुविधा

On: August 6, 2024 10:53 AM
Digi Term Insurance Plan
---Advertisement---

LIC New Scheme l भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC नेहमी देशातील तरुणांचे हित लक्षात घेऊन काही नवीन योजना लाँच करत असते. यासंदर्भात LIC ने कर्ज परतफेडीसाठी मुदत विमा आणि सुरक्षा प्रदान करण्यासाठी नवीन योजना सुरू केल्या आहेत, ज्या ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही स्वरूपात उपलब्ध असणार आहेत.

कोणत्या आहेत ‘त्या’ दोन योजना :

LIC ने युवा टर्म आणि डिजी टर्म या दोन नवीन योजना लाँच केल्या आहेत. यामध्ये युवा टर्म ही ऑफलाईन स्वरूपाची असणार आहे तर डिजी टर्म ही ऑनलाईन स्वरूपाची असणार आहे. या दोन्ही योजनांचा उद्देश हा जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर मुदत विमा खरेदी करू इच्छिणाऱ्या तरुणांच्या गरजा पूर्ण करणे आणि त्यांना ऑफलाइन किंवा ऑनलाइन खरेदी करण्याचा पर्याय प्रदान करणे हा आहे.

यासंदर्भात कंपनीने म्हटले आहे की, नियमित प्रीमियम आणि मर्यादित प्रीमियम पेमेंट अंतर्गत विमाधारकाच्या मृत्यूवर देय रक्कम वार्षिक प्रीमियमच्या 7 पट किंवा मृत्यूच्या तारखेपर्यंत भरलेल्या एकूण प्रीमियमच्या 105% किंवा मृत्यूनंतर देय पूर्ण रक्कम आहे. सिंगल प्रीमियम पेमेंट अंतर्गत, डेथ बेनिफिट एकल प्रीमियमच्या 125% किंवा मृत्यूवर भरलेली संपूर्ण रक्कम आहे.

LIC New Scheme l योजनेचा लाभ घेण्यासाठी अटी काय आहेत? :

– एलआयसीची युवा टर्म/डिजी टर्म ही एक नॉन-पार, नॉन-लिंक्ड, जीवन, वैयक्तिक, शुद्ध जोखीम योजना आहे, जी पॉलिसी मुदतीदरम्यान विमाधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास विमाधारकाच्या कुटुंबाला आर्थिक संरक्षण प्रदान करते.

– योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 45 वर्षे असावे.

– मॅच्युरिटीचे किमान वय 33 वर्षे आणि कमाल वय 75 वर्षे आहे.

– किमान मूळ विमा रक्कम 50,00,000/- रुपये आहे आणि कमाल मूळ विमा रक्कम 1,00,000/- रुपये आहे.
– उच्च विमा रक्कम सवलतीचा लाभ मिळणार.

– महिलांसाठी विशेष कमी प्रीमियम दर असणार.

News Title :  LIC Yuva Term/Digi Term Scheme Launched

महत्त्वाच्या बातम्या-

सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

धाराशिवच्या हॉटेलमध्ये राडा; राज ठाकरे मुक्कामी असलेल्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक शिरले

आवडीने चॉकलेट खाणाऱ्यांनो सावधान; रिसर्चमध्ये झाला धक्कादायक खुलासा

Diabetes असणाऱ्या रुग्णांनी ‘हे’ ड्राय फ्रूट्स खाऊ नये; अन्यथा..

रॉयल एनफिल्डला टक्कर देणार BSA ची नवी बाईक; पाहा फीचर्स

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now