LIC policy changes 2025 | भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) आणि इतर खासगी विमा कंपन्यांच्या पॉलिसीधारकांसाठी मोठी अपडेट आहे. विमा नियामक संस्था आयआरडीएआय (IRDAI) ने पॉलिसी सरेंडरवर मिळणाऱ्या रकमेच्या नियमात मोठा बदल केला आहे. आता विमा पॉलिसी सरेंडर करताना ग्राहकांना अधिक रक्कम मिळणार आहे.
सरेंडर व्हॅल्यूमध्ये २० ते ३० टक्क्यांची वाढ :
पूर्वी अनेक पॉलिसीधारक विमा मुदतीपूर्वीच बंद करत असत, पण त्यातून फारच कमी रक्कम मिळत होती. मात्र आता नव्या नियमांनुसार, सरेंडर व्हॅल्यूमध्ये 20 ते 30 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. म्हणजेच पूर्वी चार लाखांच्या पॉलिसीसाठी मिळणारी 2.4 लाखांची रक्कम आता 3.1 लाख रुपये मिळणार आहे. (LIC policy changes 2025)
आता दोन वर्षांऐवजी फक्त एक वर्ष प्रीमियम भरल्यानंतरही सरेंडर व्हॅल्यू मिळणार आहे. उदाहरणार्थ, एक लाख रुपयांच्या पॉलिसीसाठी वर्षभर प्रीमियम भरल्यानंतर आता 62,000 रुपये परत मिळू शकतात.
LIC policy changes 2025 | नवीन फॉर्म्युला आणि लाभदायक बदल :
आयआरडीएआयने सरेंडर व्हॅल्यू मोजण्यासाठी नवा फॉर्म्युला तयार केला आहे. यामध्ये 10 वर्षांच्या सरकारी बाँडवरील व्याजदर आधार मानला जाणार असून विमा कंपन्यांना त्यात कमाल 0.50% वाढ करण्याची मुभा देण्यात आली आहे. (LIC policy changes 2025)
हे नियम सिंगल प्रीमियम पॉलिसी तसेच 5 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या पॉलिसींनाही लागू असणार आहेत. विशेष म्हणजे, हे बदल सर्व एंडोमेंट पॉलिसींना लागू असून, यामुळे ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.






