Laxman Hake | मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील (Manoj jarange patil) यांनी केलेल्या आंदोलनाचा शेवट सरकारच्या निर्णयानंतर झाला असला, तरी त्यानंतर आता राज्यातील ओबीसी समाजामध्ये प्रचंड रोष उसळलेला दिसतोय. सरकारने जरांगे यांच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य करून जीआर काढल्यानंतर ओबीसी नेत्यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे.
आंदोलनामागे पवारांचा पाठिंबा? :
याच पार्श्वभूमीवर ओबीसी समाजाचे नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी पवार कुटुंबियांवर थेट गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी दावा केला आहे की, “पवार कुटुंबियांनी ओबीसींचे आरक्षण संपवले. शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचा थेट पाठिंबा जरांगे आंदोलनाला होता. एवढंच नाही तर रोहित पवारांचा आयटी सेल हे आंदोलन चालवत होता, हे ओबीसी समाज जाणतो.”
लक्ष्मण हाके म्हणाले की, “या बेकायदा आंदोलनाला उभं करण्याचं काम शरद पवारांनी केलं. सुप्रिया सुळे, खासदार बजरंग सोनावणे (Bajrang sonawane) यांनी थेट सपोर्ट केला. अजित पवार गटातील आमदार विजयसिंह पंडित, प्रकाश सोळंकी यांनीदेखील पाठिंबा दर्शवला. कोण माणसं पुरवत होतं, कोण गाड्या देत होतं, कोण पत्रकार परिषदा घेत होतं हे सगळं राज्यातील ओबीसी समाजाला माहिती आहे.” (Laxman Hake Targets Pawar Family)
Laxman Hake | ओबीसी समाजाची आक्रमक भूमिका :
त्यांनी पुढे आरोप केला की, “सरकारने काढलेला जीआर हा बेकायदेशीर आहे. मराठा आणि कुणबी हे एकच आहेत, हे कोर्टाने नाकारले आहे. पण आता या निर्णयामुळे थेटपणे ओबीसींचं आरक्षण धोक्यात आलं आहे. पवार कुटुंबियांनीच हे आरक्षण संपवलं आहे.”
मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे सरकारने घेतलेल्या निर्णयाचा फायदा मराठा समाजाला मिळणार असला, तरी त्याचवेळी ओबीसींच्या हक्कांवर गदा येणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत ओबीसी समाजही रस्त्यावर उतरून मोठं आंदोलन छेडण्याच्या तयारीत असल्याचं संकेत मिळत आहेत.






