“मनोज जरांगेंसाठी लाडका आंदोलक योजना काढा”, लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

On: July 22, 2024 6:02 PM
Laxman Hake
---Advertisement---

Laxman Hake | मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पाचव्यांचा आंतरवाली सराटी येथे आंदोलन सुरू केलं आहे.  मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं या हेतूने मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं आहे. यावरून आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मनोज जरांगेंना टोला लगावला. सरकारने मनोज जरांगेंना लाडका आंदोलक नावाची योजना जाहीर करावी असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) टीका केली.

लाडका आंदोलक योजना जाहीर करावी

आजपासून जनआक्रेश यात्रेला सुरूवात झाली. आंदोलक लक्ष्मण हाकेंनी (Laxman Hake) शासनाच्या खरापती वाटल्यासारखे कुणबी सर्टिफिकेट वाटलं जात असल्याचा आरोप केला गेला आहे. शासनाने लाडकी बहीण, लाडका भाऊ योजना आणली तशी लाडका आंदोलक योजना जरांगेंसाठी जाहीर करावी. आपल्या शासनकर्ते मुख्यमंत्र्यांना आमची विनंती आहे. तुम्ही आमचं आरक्षण टिकवणार आहात का?, असा सवाल त्यांनी केला.

दरम्यान लक्ष्मण हाकेंचे (Laxman Hake) साथीदार नवनाथ वाघमारे यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. प्रशासन आणि सामान्य जनतेला वेठीस धरण्याचं काम हे मनोज जरांगे पाटील करताना दिसत आहे. जरांगे नावाच्या बांडगुळाने राज्यात हौदास केला असल्याचा गंभीर आरोप नवनाथ वाघमारे यांनी केला आहे.

जरांगेंच्या आंदोलनामागे कोणाचा हात आहे हे सर्व महाराष्ट्राला माहिती झालं. मनोज जरांगेंच्या मागे खुद्द मुख्यमंत्री असल्याचं सांगत आंदोलक नवनाथ वाघमारे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

“ओबीसी-मराठा वादात शरद पवार”

यावेळी बोलत असताना लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. ओबीसी-मराठा वादात शरद पवार आहेत. ते मूग गिळून गप्प आहेत. तसेच उद्धव ठाकरे देखील काहीही बोलत नसल्याचं हाके म्हणाले आहेत.

मनोज जरांगेंचं आंदोलन हे बेकायदेशीर आहे. त्यांचं आंदोलन हे पॉलिटिक्स स्क्रिप्टनुसार सुरू असल्याचा आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी केला आहे. महामानवांच्या पुतळ्याखाली बसून मनोज जरांगे अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत असल्याचा आरोप लक्ष्मण हाकेंनी केला आहे.

News Title – Laxman Hake Slam To Manoj jarange Patil

महत्त्वाच्या बातम्या

“शरद पवार भ्रष्टाचाऱ्यांचे सरदार असतील तर, मग अजित पवार कोण?”

मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाचा आज तिसरा दिवस, सरकारच्या भूमिकेकडं सर्वांचंच लक्ष

गर्भवती महिलेसोबत घडलं असं काही..; व्हिडीओ बघून तुम्ही सुद्धा हैराण व्हाल!

मुंबईकरांनो समुद्र किनारी जाऊ नका! मुंबई पोलिसांकडून मोठं आवाहन

इंडियन रेल्वेकडून बंपर भरती, दहावी पास तरुणही करू शकतात अर्ज!

Join WhatsApp Group

Join Now