“… तर सुरेश धस यांना बंदुकी दिसल्या नाहीत का?”; ‘या’ नेत्याचा मोठा दावा

On: January 8, 2025 4:35 PM
Suresh Dhas
---Advertisement---

Suresh Dhas l सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. अशातच आज सकल ओबीसी समाजाच्यावतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच या दोन्ही घटनांचा निषेध करत आंदोलन करण्यात आलं. हे आंदोलन ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली पार पडलं आहे. मात्र या आंदोलनादरम्यान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

लक्ष्मण हाके नेमकं काय म्हणाले? :

आज छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या आंदोलनात लक्ष्मण हाके यांनी सुरेश धस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या घटना घडल्या अगदी त्याचवेळी पुण्यात राजगुरूनगरमध्ये दोन मुलींची हत्या झाल्याची घटना घडली आहे. तसेच या अशा घटना घडल्यावर राज्यात गुन्हेगारांची जात शोधून त्यांना आरोपीच्या कठड्यात उभे करण्यात येते” असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.

मात्र सध्या राज्यात आमदार सुरेश धस हे आता मनोज जरांगे यांची भाषा बोलत आहेत. कारण सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं राजकारण केलं आहे. तसेच निवडून आलेला माणूस आपल्याच पक्षाच्या नेत्यावर टीका करत आहे असा सवाल उपस्थित केला आहे.

Suresh Dhas l सुरेश धस यांना बंदुकी दिसल्या नाहीत का? :

मात्र ज्यावेळी अंतरवाली सराटीमध्ये गोळीबार झाला, त्यावेळी बीडमध्ये मोठ्या प्रमाणात जाळपोळ झाला आहे, मात्र त्यावेळी आमदार सुरेश धस यांना बंदुकी दिसल्या नाहीत का? असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुमच्याच पक्षाचा माणूस तुमच्याच गृहविभागावर प्रश्न निर्माण करत आहे. तसेच ज्या वाल्मिक कराडचे फोटो मंत्री धनंजय मुंडेंसोबत आहेत, तसेच त्यांचे फोटो शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुरेश धस यांच्यासोबत सुद्धा आहेत. मात्र निवडणूक जिंकायला तुम्हाला वाल्मिक कराड लागतो, तसेच तुम्ही जात बघून अधिकारी बाजूला काढत असाल तर आम्ही जात काढावी का? असा सवाल ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केला आहे.

News Title – Laxman hake on suresh dhas

महत्त्वाच्या बातम्या –

आताची सर्वात मोठी अपडेट!, वाल्मिक कराडविरोधात पोलिसांना सर्वात मोठा पुरावा मिळणार?

मुंबईकरांना भुयारी मेट्रो मार्ग मिळणार!

देशभरातील HMPV च्या रुग्णांचा आकडा समोर!

नवी मुंबईतल्या सिडकोच्या घरांच्या किंमती जाहीर!

HMPV ने चिंता वाढवली, राज्यात ‘या’ ठिकाणी 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now