मनोज जरांगेंच्या निर्णयावर लक्ष्मण हाकेंची खरपूस प्रतिक्रिया; म्हणाले…

On: November 4, 2024 12:36 PM
Laxman Hake vs Manoj Jarange
---Advertisement---

Manoj Jarange l विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतून मनोज जरांगे यांनी माघार घेतल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. कारण मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे हे विधानसभा निवडणुकीत तब्बल 288 जागांवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात मनोज जरांगे यांनी माघार घेतली आहे.

जरांगे नावाचं वटवाघूळ स्वत:च्या औकातीवर आलं :

मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरणारे मनोज जरांगे पाटील विधानसभा निवडणूकीत 288 जागा पाडण्यासाठी उत्सूक होते. मात्र त्यांनी अचानकपणे माघार घेतल्याने ओबीसी आरक्षण नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांवर जोरदार टीका केली आहे. तेसच मनोज जरांगे नावाचं वटवाघूळ स्वत:च्या औकातीवर आलं. असं लक्ष्मण हाके म्हणाले आहेत.

मनोज जरांगे यांच्या पाडापाडीच्या भूमिकेवर देखील लक्ष्मण हाके यांनी घणाघाती टीका केली आहे. जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतील काही मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार असल्याचं जाहीर केल्यानंतर आणि आता निवडणुकीतून पूर्णपणे माघार घेतल्याने ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जरांगे पाटलांना चांगलचं घेरलं आहे.

Manoj Jarange l बारामतीच्या सांगण्यावरून मनोज जरांगे यांनी प्रचार केला :

यासंदर्भात मनोज जरांगे पाटील म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर जे उमेदवार देणार होते त्यांनीच आता माघार घेली आहे. अशातच आता मी नेहमी सांगत आलो होतो, मनोज जरांगे हे निवडणूक लढणार नाहीत. कारण ते बारामती स्क्रिप्ट नुसार वागत आहेत. याशिवाय जत्रा भरवण सोप असतं पण लढण मायर अवघड असतं.

तसेच लोकसभा निवडणुकीत बारामती सांगण्यावरून मनोज जरांगे यांनी प्रचार केला आहे. तसेच आज ओबीसी समाज देखील एकवटला आहे. त्यामुळे आता त्यांनी रणांगणातून माघार घेतली आहे. तसेच आता बारामतीकरांच्या सांगण्यावरून रणांगणातून माघार घेतली असल्याचं ते म्हणाले आहेत.

News Title – Laxman Hake on Manoj Jarange

महत्त्वाच्या बातम्या-

HDFC बँकेची UPI सेवा दोन दिवस बंद राहणार!

जरांगेंनी माघार घेण्याचं कारण सांगितलं; म्हणाले, “उमेदवार पडला तर जातीचं हसू..”

ब्रेकिंग! मनोज जरांगेंची निवडणुकीतून माघार, अचानक का घेतला निर्णय?

दिवाळीच्या फराळातून पैसे वाटप; सांगलीत शरद पवारांचा उमेदवार अडचणीत?

सिनेइंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाचा कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now