ओबीसी नेते लक्ष्मण हाके अडचणीत; ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून बीडमध्ये मोठा विरोध

On: September 15, 2025 3:44 PM
Laxman Hake
---Advertisement---

Laxman Hake | मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर वातावरण चांगलेच तापले आहे. या निर्णयाला ओबीसी समाजाचा तीव्र विरोध होत असून, याच पार्श्वभूमीवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी गेवराई तालुक्यातील शिंगरवाडी फाटा येथे सभा घेतली. या सभेत बोलताना त्यांनी मराठा समाजातील मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्याचा मोठा परिणाम होत असून, हाके यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे.

परळीत गुन्हा दाखल, घोषणाबाजीचा जोर :

परळी शहर पोलीस ठाण्यात हाके यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक कार्यक्रमात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात BNS 1994, 196, 997, 298, 299 आणि 124 अशा विविध कलमांखाली अदखलपात्र गुन्हा दाखल झाला आहे. (Laxman Hake controversy)

तक्रारदार देवराव रामराव लुगडे यांच्या निवेदनावरून ही कारवाई करण्यात आली. गुन्हा दाखल होताच मराठा समाजातील मोठ्या संख्येने बांधव पोलीस ठाण्यासमोर जमा झाले आणि “हाके यांना अटक करा, जिल्ह्यातून हद्दपार करा” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

Laxman Hake | नेकनूरमध्येही कारवाई, तिसरा गुन्हा नोंद :

हाके यांच्या अडचणीत भर टाकणारी दुसरी तक्रार बीडच्या नेकनूर पोलीस ठाण्यात दाखल झाली. जगन्नाथ घोडके यांनी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या विरोधात पुन्हा गुन्हा नोंद झाला आहे. या प्रकरणात गेल्या दोन दिवसांत लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांच्याविरुद्ध एकूण तीन अदखलपात्र गुन्हे नोंदवले गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

हाके यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. अनेक ठिकाणी आक्रमक पवित्रा घेत आंदोलने सुरू झाली आहेत. दुसरीकडे, हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी समाजदेखील रस्त्यावर उतरला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसी आमनेसामने आलेले दिसत आहेत.

News Title : Laxman Hake in Trouble: FIRs Filed After Controversial Statement on Maratha Girls in Beed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now