“जरांगे पाटलांनी आधी इंग्रजी शिकून Reservation चं स्पेलिंग लिहून दाखवावं”, लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका

On: September 19, 2025 12:18 PM
Laxman Hake vs Manoj Jarange
---Advertisement---

Laxman Hake vs Manoj Jarange | बीड जिल्ह्यातील केज आणि गेवराई येथे आयोजित महाएल्गार सभेत ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. हाके यांनी थेट आव्हान देत म्हटलं – “जरांगे पाटील यांनी आधी इंग्रजी शिकून Reservation चं स्पेलिंग लिहून दाखवावं. दिल्लीला न जाता अमेरिका किंवा आफ्रिकन देशात जावं आणि तिथे आरक्षणाचं ज्ञान पाजळावं.” (Laxman Hake vs Manoj Jarange)

हाकेंचे जरांगेंना टोले :

लक्ष्मण हाके म्हणाले, “ज्या भूमीतून ओबीसींचं आरक्षण संपवलं, त्याच भूमीत आम्ही सभा घेत आहोत. दिल्लीला जाऊन अगरबत्ती कुठे लावणार? इथल्या कारखानदारांनी जरांगे यांना गुळाचा गणपती केला आहे. आम्हाला अंडरस्टिमेट करू नका. माझ्यासाठी अकराशे जणांची टीम तयार करा, मी प्रत्युत्तर द्यायला तयार आहे.”

हाके यांनी पुढे सांगितले की, गेली दोन वर्षे त्यांनी संविधानाची भाषा बोलली, मात्र आता विद्रोहाची भाषा बोलत असल्याचे स्पष्ट केले. ते दसऱ्यानंतर मुंबईत मोठं आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.

Laxman Hake vs Manoj Jarange | लग्न प्रस्तावावरून घेतला यू-टर्न :

आठवडाभरापूर्वी लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी जरांगे पाटलांसमोर एक वादग्रस्त प्रस्ताव मांडला होता. त्यांनी जाहीर सभेतून म्हटलं होतं की, “कुणबी प्रमाणपत्राद्वारे मराठा समाज ओबीसींमध्ये आला असल्याने पहिले 11 विवाह ओबीसी समाजातील तरुणांसोबत लावून देऊया.” या विधानावर मोठा वाद झाला होता. (Laxman Hake vs Manoj Jarange)

मात्र आता हाके यांनी यू-टर्न घेत, “मी तसे काही बोललो नाही” असं सांगितलं आहे. तरीही हा विषय राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा ठरला आहे.

News Title: Laxman Hake Challenges Manoj Jarange: “Learn English, Spell Reservation, Don’t Go to Delhi – Go to America or Africa”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now