‘खरंतर लक्ष्यानेच स्वतःचं आयुष्य स्वतः संपवलं…’; भावाने केला अत्यंत धक्कादायक खुलासा

On: March 10, 2024 6:12 PM
lakshmikant Berde
---Advertisement---

Lakshmikant Berde | मराठी सिनेसृष्टितील विनोदी आणि सर्वोतकृष्ट अभिनेता म्हणून दिवंगत लक्ष्मीकांत बेर्डेंची ओळख आहे. फार कमी कालावधीत त्यांनी आपलं नाव प्रत्येकाच्या मनामध्ये आरुढ केलं. 80 आणि 90 चं दशक गाजवणारे लक्ष्मीकांत बेर्डेंचे चित्रपट आज देखील तेवढ्याच आवडीने पाहिले जातात. जरी लक्ष्मीकांत बेर्डे आपल्यात नसले तरी मात्र, त्यांच्या आठवणी आपल्यामध्ये कायम आहेत. लहानांपासून अगदी मोठ्यापर्यंत आजही या अभिनेत्याचा प्रत्येक वर्गात चाहता आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या अचानक एक्झिटने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला होता. दरम्यान, त्यांचे बंधू पुरुषोत्तम बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनावर खुलासा केला आहे.

काय म्हणाले पुरुषोत्तम बेर्डे?

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना लक्ष्मीकांत बेर्डे (Lakshmikant Berde)  यांचे बंधू पुरुषोत्तम यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या निधनावर भाष्य केलं होतं. पुरुषोत्तम म्हणाले की, ‘खरं तर लक्ष्यानेच स्वतःला संपवलं. ज्यावेळेस त्याला त्याच्या शरिराकडे जास्त लक्ष देण्याची गरज होत,  तेव्हा त्याने ते केलं नाही. पुढे ते म्हणाले की, तुमचं शरिर हे फार महत्त्वाचं माध्यम असतं आणि जर तेच नसेल तर मग तुम्ही कुठे जाणार? त्यामुळे जेव्हा तुमचं शरीर नष्ट होईल, तेव्हा तुमचं सगळंच संपतं, हेच नेमके लक्ष्याच्या बाबतीत झालं.’

लक्ष्याने त्याला हवं ते केलं-

लहानपणापासूनच लक्ष्मीकांतने (Lakshmikant Berde) कधीच कोणाचं एकलं नाही. त्यामुळे मी सुद्धा त्याला या गोष्टी सांगू शकलो नाही, किंवा या गोष्टीपासून लांब ठेऊ शकलो नाही. एवढंच नव्हे तर जेव्हापासून तो सुपरस्टार झाला तेव्हा त्याचे एक आयुष्य सुरु झालं. पण त्यापासून लांब जाण्यासाठी त्याला अध्यात्माची गरज होती. लक्ष्याने कायम त्याला जे हवे तेच केले. त्यामुळे त्याने कोणाचं तरी ऐकायला हवं होतं.”

भाऊ म्हणून मी काही करु शकलो नाही-

लक्ष्मीकांतच्या जाण्याने मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टित दुखःचा डोंगर कोसळला होता. पुरुषोत्तम म्हणाले की, जर तेव्हा लक्ष्मीकांतने कोणाचं एकलं असतं तर आज असं झालं नसतं. माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी खंत ही आहे की, एक भाऊ म्हणून एक मित्र म्हणून मी त्याच्या त्या काळामध्ये काहीच करु शकलो नाही, असं देखील पुरुषोत्तम म्हणाले. जे त्याच्यासाठी महत्त्वाचं माध्यम होतं शरीर, तेच त्यानं संपवलं आणि स्वत:लाही. पण याची जाणीव त्याला अगदी शेवटाला झाली. तो माझ्याकडे आला आणि त्याने माझ्याकडून एका गंभीर विषयावर नाटक लिहून घेतलं. “सर आली धावून” हे त्याच्या शेवटच्या काळातलं नाटक, असं ते म्हणाले.

News Title : lakshmikant berde killed himself

महत्त्वाच्या बातम्या-

“तुमचा नवरा सारखा मोदी-मोदी करत असेल तर…”; केजरीवालांचा महिलांना अजब सल्ला

सुप्रिया सुळे-अजित पवार एकाच मंचावर, सुळेंचा सवाल आणि त्यावर पवारांची टोलेबाजी!

मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी, इतर संघांचं वाढलं टेन्शन!

सीमा हैदरच्या अडचणीत वाढ, नवऱ्याकडून तब्बल इतक्या कोटी रुपयांची मागणी

‘या’ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक ठरणार!

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now