Lakshmi Puja 2025 | दिवाळी म्हटली की सर्वाधिक महत्त्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन. या दिवशी घराघरात धन, समृद्धी आणि सौभाग्याच्या देवी लक्ष्मीमातेसह कुबेरदेव आणि गणपती बाप्पाची विधीवत पूजा केली जाते. मात्र यंदा (2025) लक्ष्मीपूजन 20 ऑक्टोबर की 21 ऑक्टोबर रोजी करायचे, यावरून नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. चला तर जाणून घेऊया यंदाच्या दिवाळीत लक्ष्मीपूजनाची खरी तारीख आणि शुभ मुहूर्त काय आहे. (Lakshmi Puja 2025)
लक्ष्मीपूजनाची खरी तारीख — 20 की 21 ऑक्टोबर? :
अमावस्या तिथी 20 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3.44 वाजता सुरू होईल आणि 21 ऑक्टोबर 2025 रोजी संध्याकाळी 5.54 वाजता समाप्त होईल. त्यामुळे दोन्ही दिवशी अमावास्या तिथी प्रदोषकाळात (संध्याकाळी) येते. अशा वेळी कोणता दिवस निवडावा याबाबत पंचांगकर्त्यांनी स्पष्ट मार्गदर्शन दिले आहे. (Lakshmi Puja 2025)
पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक यांच्या मते, धर्मशास्त्रातील निर्णयसिंधू आणि धर्मसिंधू ग्रंथांनुसार, “जेव्हा दोन दिवस अमावास्या प्रदोषकाळात असेल, आणि सूर्यास्तानंतर किमान 24 मिनिटे तिथी विद्यमान असेल, तर त्या दिवशी लक्ष्मीपूजन करावे.”
या नियमांनुसार, महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान, आंध्र प्रदेशातील काही भाग आणि तामिळनाडू येथे 20 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन करणे शास्त्रसंमत ठरते. तर उत्तर आणि पूर्व भारतातील प्रदेशांमध्ये, जसे की गोरखपूर, प्रयागराज, बिहार, ओडिशा आणि बंगाल, येथे 21 ऑक्टोबर 2025 रोजी लक्ष्मीपूजन होईल.
Lakshmi Puja 2025 | लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त :
ज्योतिषशास्त्रज्ञ यांच्या मते, लक्ष्मीपूजन सूर्यास्तानंतरच्या अडीच तासांत करणे सर्वात शुभ मानले जाते.
मुहूर्त:
– 21 ऑक्टोबर 2025
– संध्याकाळी 6.10 ते रात्री 8.40 दरम्यान
या कालावधीत देवी लक्ष्मी, कुबेर आणि गणपती बाप्पाची पूजन-विधी केल्यास धनलाभ, सौख्य आणि समृद्धी प्राप्त होते, असे धर्मशास्त्र सांगते. (Lakshmi Puja 2025)
तसेच या दिवशी घराची स्वच्छता, सजावट, दिव्यांचा प्रकाश आणि धनलक्ष्मीचे स्वागत हे सर्व करताना आनंद, भक्ती आणि सकारात्मक ऊर्जा यांचा संगम घडवणेच खरी दिवाळी ठरते.






