ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानच्या अडचणी आणखी वाढल्या; घेतला मोठा निर्णय

On: May 8, 2025 10:39 AM
Operation Sindoor
---Advertisement---

Operation Sindoor | भारताने केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईनंतर पाकिस्तानच्या (Pakistan) अडचणी थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. गुरुवारी सकाळी पाकिस्तानचे (Pakistan) लाहोर (Lahore) शहर एकापाठोपाठ एक झालेल्या अनेक बॉम्बस्फोटांनी हादरले. हे स्फोट जुन्या वॉल्टन विमानतळाजवळ (Walton Airport) झाले असून, त्यानंतर लाहोर विमानतळ (Lahore Airport) बंद करण्यात आले आहे.

स्फोटांचा आवाज, मिसाईल की ड्रोन?

गुरुवारी सकाळी लाहोरच्या वॉल्टन रोडवरील (Walton Road) गोपाळ नगर (Gopal Nagar) आणि नसीराबाद (Nasirabad) भागात लागोपाठ अनेक स्फोट झाले. स्फोटांचे आवाज ऐकून नागरिक घाबरून घराबाहेर पडले आणि परिसरात दहशतीचे वातावरण पसरले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, हे मिसाईल हल्ले (Missile Attack) होते. मात्र, पोलीस सूत्रांनुसार, वॉल्टन एअरपोर्टजवळ ड्रोनद्वारे स्फोट (Drone Blast) घडवण्यात आले. जॅमिंग सिस्टीममुळे (Jamming System) हे ड्रोन पाडण्यात यश आल्याचा दावा स्थानिक पोलिसांनी केला आहे.

या स्फोटांमध्ये किती जीवितहानी झाली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु इमारतींचे मोठे नुकसान झाल्याचे फोटोंमधून दिसत आहे. या घटनेनंतर लाहोर विमानतळ (Lahore Airport) तात्काळ बंद करण्यात आल्याने अनेक उड्डाणे रद्द झाली असून, प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. समा टीव्हीने (Samaa TV) याबाबत वृत्त दिले आहे.

पाकिस्तानसमोरील दुहेरी संकट

पहलगाम (Pahalgam) येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान (Pakistan) दहशतीच्या सावटाखाली आहे. ७ मे रोजी भारताने (India) ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) अंतर्गत पाकिस्तान (Pakistan) आणि पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले, ज्यात जैश-ए-मोहम्मदचा (Jaish-e-Mohammed) म्होरक्या मसूद अझहरच्या (Masood Azhar) कुटुंबाचाही समावेश होता. या कारवाईने पाकिस्तानमधील (Pakistan) दहशतवादाचे कंबरडे मोडले.

एकीकडे भारताच्या (India) कारवाईचा दबाव असताना, दुसरीकडे पाकिस्तानला (Pakistan) अंतर्गत बंडखोरीचाही सामना करावा लागत आहे. बलोच लिबरेशन आर्मीने (BLA – Baloch Liberation Army) मंगळवारी पाकिस्तानी (Pakistani) लष्कराच्या एका वाहनावर हल्ला करून अनेक सैनिकांना ठार केले. अशा दुहेरी संकटामुळे पाकिस्तान (Pakistan) सध्या मोठ्या अडचणीत सापडला आहे.

Title : Lahore Blasts Follow Operation Sindoor

 

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now