लाडक्या बहिणींच्या खात्यात ४५०० रुपये कधी जमा होणार? सरकारने अखेर तारीख केली निश्चित!

On: February 4, 2026 4:54 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट बँक खात्यात दिले जातात. मात्र ई-केवायसी प्रक्रियेमुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांचे हप्ते अनेक महिलांना मिळाले नव्हते. त्यामुळे राज्यभर नाराजी व्यक्त होत होती आणि पैसे कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

आता महिला व बालविकास विभागाने यावर तोडगा काढत मोठा निर्णय घेतला आहे. थकित तीन महिन्यांचा हप्ता एकत्रितपणे देण्यात येणार असून पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट ४,५०० रुपये जमा केले जाणार आहेत. अर्जांची छाननी आणि पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी महिन्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती विभागाकडून देण्यात आली आहे.

कोणाला किती रक्कम मिळणार? :

ज्या महिलांना यापूर्वी नोव्हेंबर आणि डिसेंबरचे हप्ते मिळालेले नाहीत, त्यांना तीन महिन्यांचे एकत्रित ४,५०० रुपये मिळणार आहेत. तर ज्या महिलांना आधीच दोन महिन्यांचे पैसे मिळाले आहेत, त्यांना फक्त जानेवारी महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता दिला जाईल. त्यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या खात्याची स्थिती तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महिला व बालविकास विभागाकडून ई-केवायसी पूर्ण न झालेल्या अर्जांची फेरपडताळणी सुरू आहे. अंगणवाडी सेविकांमार्फत घरोघरी जाऊन माहिती तपासली जात असून त्रुटी असलेले अर्ज दुरुस्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होताच पैसे जमा केले जातील.

Ladki Bahin Yojana | पैसे जमा झाले का? कुठे तपासाल? :

लाभार्थी महिलांनी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर ladakibahin.maharashtra.gov.in येथे लॉगिन करून आपल्या अर्जाची आणि पेमेंटची स्थिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ई-केवायसी आणि कागदपत्र पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच खात्यात रक्कम जमा होईल.

विधानसभा निवडणुकीच्या काळात सुरू झालेल्या या योजनेचा लाखो महिलांना फायदा होत असून, या महिन्यात थकित रक्कम मिळण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींसाठी ही निश्चितच दिलासादायक बातमी ठरणार आहे.

News Title: Ladki Bahin Yojana: When Will Women Get ₹4500? February Payment Date Finally Announced

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now