‘त्या’ लाडक्या बहीणींचे पैसे पुन्हा सरकारजमा; कारण…

On: January 4, 2025 11:05 AM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana l राज्य सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेच्या अंतर्गत महिलांना प्रतिमहा 1500 रुपये दिले जातात. अशातच आतापर्यंत या योजनेचे सहा हप्ते देखील महिलांच्या खात्यावर जमा झाले आहेत. मात्र आता या योजनेसंदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती समोर आली आहे. कारण या योजनेत अपात्र ठरलेल्या लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकारजमा करण्यात येत आहे.

सरकारने उचलले मोठे पाऊल :

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आतापर्यंत कोट्यावधी महिलांनी लाभ घेतला असून डिसेंबरचा हप्ता देखील काही दिवसांपूर्वीच महिलांच्या खात्यावर जमा झाला आहे. तसेच राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा आल्यास ही रक्कम 1500 रुपयांहून 2100 रुपये करू अशी घोषणा महायुतीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केली होती. त्यामुळे राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे..

मात्र आता या योजनेसंदर्भात महत्वाची माहिती समोर आली आहे. कारण या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारने काही निकष दिले होते. मात्र या निकषांचं उल्लंघन करून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा’ लाभ घेतलेल्या महिलांवर आता कारवाई सुरू झाली असून त्याअंतर्गतच हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana l निकष काय आहेत? :

दरम्यान, अपात्र लाडक्या बहिणींची रक्कम पुन्हा सरकारजमा करण्यात आली आहे. त्यानुसार, धुळे जिल्ह्यात लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या एका महिलेला मिळालेले 7500 रुपये सरकारच्या तिजोरीमध्ये पुन्हा जमा करावे लागले आहेत. त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची पडताळणी देखील होणार आहे.

– तर वार्षिक एकत्रित उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल,तर अपात्र ठरणार.
– आधार आणि बँक नावात तफावत असेल तर त्या महिला अपात्र ठरतील.
– ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही..
– या चारचाकी वाहनांमधून ट्रॅक्टर वगळण्यात आला आहे.
– ज्या महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात त्यांना लाभ मिळणार नाही.
– कुटुंबातील सदस्य नियमित, कायम, कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागामध्ये काम करत असतील तर अशा महिला अपात्र ठरतील.
– तसेच इतर योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना याचा लाभ मिळणार नाही.

News Title – Ladki Bahin Yojana Update

महत्त्वाच्या बातम्या-

विष्णू चाटेनं अखेर तोंड उघडलं, वाल्मिक कराडबाबत दिली अत्यंत धक्कादायक कबुली

संतोष देशमुख हत्याप्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर!

महाराष्ट्रातील राजकारण तापणार?, परभणीत आज सर्वपक्षीय मूक मोर्चा

“हिंदीच बोलायचं, मराठीत बोलला तर…”; पुण्यात मराठी-हिंदी वाद पेटला, नेमकं काय घडलं?

शरद पवार महायुतीत सामील होणार?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now