पुण्यातील 10 हजार लाडक्या बहिणी अपात्र; काय आहे कारण?

On: December 11, 2024 3:20 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki bahin yojana l महाराष्ट्रात सरकारने राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना राबवली आहे. या योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. मात्र आता या योजनेच्या अर्जांची छाननी केली जात आहे. या छननीत अनेक अर्ज अपात्र ठरत असल्याने लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्याला मुकणार आहेत.

पुण्यातील लाडक्या बहिणींना धक्का :

अशातच आता पुणे जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत तब्बल 10 हजार बहिणी अपात्र ठरल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जाची छाननी करण्यात सुरवात करण्यात आली. मात्र त्यामध्ये विविध त्रुटींमुळे बहिणी अपात्र ठरत असल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, पुणे जिल्ह्यातील 20 लाख 84 हजार अर्जदार महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती महिला बालकल्याण विभागाने दिली आहे. तसेच या योजनेसाठी १५ ऑक्टोंबरपर्यंत पुणे जिल्ह्यातून 21 लाख 11 हजार 363 अर्ज मंजूर करण्यात आले होते. मात्र त्यामधील अजूनही 12 हजार अर्जांची छाननी करण्याचे काम बाकी आहे. तर आतापर्यंत 9 हजार 814 अर्ज त्रुटीमुळे अपात्र देखील ठरले आहेत. तसेच 5 हजार 814 अर्जामध्ये किरकोळ त्रुटी सापडल्याने तात्पुरते ते अर्ज नाकारण्यात आले आहेत.

ladki bahin yojana l अपात्रांकडून पैसेही परत :

याशिवाय सर्वात महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अनेक लाभार्थी अपात्र ठरत आहेत. तसेच त्या अपात्र लाभार्थ्यांनी पैसे सुद्धा परत केले आहेत. त्यामुळे आता अपात्र लाभार्थ्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती महिला व बालकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांनी दिली.

‘या’ कागदपत्रांची तपासणी होणार :

उत्पन्नाचा पुरावा : अर्जदारांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्रं सादर करणं आवश्यक आहे, ज्याची मर्यादा वार्षिक 2.5 लाख रुपये आहे

आयकर प्रमाणपत्र : लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जांची छाननी केली जाईल.(Ladki Bahin Yojana)

सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी : निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांची तपासणी केली जाईल. यात त्रुटी आढळल्यास अर्ज बाद केले जातील.

News Title –  Ladki bahin yojana Ten thousand women are ineligible in Pune 

महत्त्वाच्या बातम्या :

BJP आमदाराच्या मामाच्या हत्ये संदर्भात धक्कादायक माहिती समोर

“…तरच डिसेंबरचा हप्ता मिळणार”; लाडक्या बहीणींनो अर्जाला ‘ही’ कागदपत्रे जोडली तर होती ना?

विरोधी पक्षनेते पद कोणाला मिळणार? नार्वेकरांनी दिली माहिती

‘वेलकम’ फेम अभिनेत्याचं एअरपोर्टवरून अपहरण!, सिनेइंडस्ट्रीत एकच खळबळ

अखेर मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात घेतला असा निर्णय?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now