लाडकी बहिण योजना बंद होणार?; ‘या’ बड्या नेत्याच्या गौप्यस्फोट!

On: December 29, 2024 1:58 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळवून देणारी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही योजना आता वादाच्या भोवऱ्यात आली आहे. उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी खासदार विनायक राऊत यांनी या योजनेबाबत एक मोठा दावा केला आहे. विनायक राऊत यांनी माध्यमांशी बोलताना असा दावा केला आहे की, ही योजना केवळ निवडणुकीच्या हेतूने सुरू करण्यात आली होती आणि निवडणुका झाल्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल.

काय आहे प्रकरण?

लाडकी बहिण योजनेचा (Ladki Bahin Yojana)  प्रयोग निवडणुकीच्या राजकारणासाठी केला गेला असल्याचा आरोप केला आहे. निवडणुकीच्या राजकारणासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. निवडणुका झाल्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल, हे नक्कीच आहे, असं विनायक राऊत म्हणाले. महायुती सरकारने जुलै महिन्यात ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची’ घोषणा केली होती. या योजनेंतर्गत 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा करण्यात येतात. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने आश्वासन दिलं होतं की सरकार पुन्हा निवडून आल्यास लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपये देण्यात येतील.

अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय-

निवडणुकीनंतर महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर, लाडकी बहीण योजनेच्या (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गरजू महिलांना अर्थसहाय्य करण्यात पारदर्शकता यावी, यासाठी ही पडताळणी करण्यात येणार आहे. अर्जदारांच्या उत्पन्नाचा दाखला, प्राप्तिकर प्रमाणपत्र, निवृत्तीनंतरची पेन्शन आणि वाहन मालकी, जमिनीची मालकी यासारख्या अनेक निकषांवरून अर्जदारांची छाननी केली जाणार आहे.

विनायक राऊत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येत आहेत. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेच्या यशाबद्दल बोलताना असे म्हटले आहे की ही योजना महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्वाचे पाऊल आहे आणि यामुळे महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यात मदत होईल.

News Title : Ladki Bahin Yojana Scheme Controversy

महत्त्वाच्या बातम्या-

वैद्यकीय क्षेत्रात नवी क्रांती… आता इंजेक्शन घेण्यासाठी सुईची गरज नाही!

सतीश वाघ हत्या प्रकरणाला नवं वळण, पत्नी मोहिनीचे पतीबद्दल धक्कादायक खुलासे

अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने मजुरांना चिरडलं, एकाचा जागीच मृत्यू, व्हिडीओ तूफान व्हायरल!

संतोष देशमुख प्रकरणी संभाजीराजेंचा संताप, ‘म्हणाले अजित दादांना मी…’

‘पंकूताई वाट वाकडी करून…’; सुरेश धसांचा मंत्री पंकजा मुंडेंना सवाल

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now