Ladki Bahin Yojana l ‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार का? अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काँग्रेसच्या (Congress) खासदार (MP) प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी ‘लाडकी बहीण’ योजनेवरून सरकारला लक्ष्य केले आहे. त्याला कारणही तसेच आहे, सरकारकडून सुरू असलेली योजनेच्या अर्जांची पडताळणी. (Verification of Applications)!
‘लाडकी बहीण’ योजनेवरून राजकीय (Political) आरोप-प्रत्यारोप (Allegations)
गेल्या काही दिवसांपासून ‘लाडकी बहीण’ योजना पुन्हा एकदा चर्चेत आहे. दंडासह (Penalty) पैसे वसूल (Recovery) केले जाणार, या भीतीमुळे काही महिलांनी (Women) ‘लाडकी बहीण’ योजनेतून माघार (Withdrawal) घेतली आहे.
त्यावरून विरोधकांनी (Opposition) सरकारला पुन्हा एकदा धारेवर धरायला सुरुवात केली आहे. सोलापूरच्या (Solapur) खासदार प्रणिती शिंदे यांनीही या योजनेवरून सरकारवर जोरदार हल्ला चढवत टीका केली.
‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार असल्याचा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. विरोधकांकडून सातत्याने ‘लाडकी बहीण’ योजनेविरोधात प्रचार (Propaganda) सुरू असतानाच, सरकारनेही आता या प्रकरणी खुलासा केला आहे. राज्याचे अर्थमंत्री (Finance Minister) आणि उपमुख्यमंत्री (Deputy Chief Minister) अजित पवार यांनी काँग्रेसचा हा आरोप फेटाळला (Dismissed) आहे.
‘लाडकी बहीण’ योजना बंद होणार नसल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले. पण, या योजनेच्या लाभार्थ्यांना (Beneficiaries) चाळण लावण्याचे (Filtering) स्पष्ट संकेत (Indications) मात्र अजित पवारांनी दिले.
Ladki Bahin Yojana l गरजू महिलांनाच (Needy Women) लाभ देण्यासाठी अर्जांची पडताळणी :
‘लाडकी बहीण’ योजना गरजू आणि गरीब महिलांसाठी सुरू केली होती. दरम्यानच्या काळात अनेक महिलांनी योजनेचा लाभ घेतला. परंतु, योजनेचा लाभ अधिकाधिक गरजू महिलांनाच मिळावा, असा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगत अर्जांच्या पडताळणीचे एकप्रकारे अजित पवार यांनी समर्थन (Support) केले आहे.
News Title : Ladki Bahin Yojana: Praniti Shinde slams government, Ajit Pawar clarifies






