Ladki Bahin Yojana | महाराष्ट्रातील “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना ही राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय योजनांपैकी एक ठरली आहे. पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाते. मात्र नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप जमा न झाल्याने राज्यातील लाखो लाभार्थी महिलांमध्ये चिंतेचं वातावरण होतं. नोव्हेंबर संपल्यानंतरही खात्यात पैसे न आल्याने अनेकांनी शासनाकडे अपडेटची मागणी केली होती.
या पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर आली आहे. शासनाकडून केवायसी प्रक्रियेसाठी दिलेल्या अंतिम मुदतीत अलीकडेच बदल करण्यात आला आहे. अनेक महिलांची ई-केवायसी वेळेत पूर्ण न झाल्याने मोठ्या प्रमाणात मुदतवाढीची मागणी होत होती. यानुसार राज्य सरकारने 31 डिसेंबरपर्यंत केवायसीची अंतिम मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे लाखो महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसीची मुदतवाढ, लाभार्थ्यांना मोठा दिलासा :
पूर्वी केवायसीसाठी 18 नोव्हेंबरपर्यंतची मुदत निश्चित होती. परंतु तांत्रिक अडचणी, ओळखपत्र विसंगती आणि स्थानिक स्तरावरील अडथळ्यांमुळे अनेक महिलांचे केवायसी काम अपूर्ण राहिले होते. त्यामुळे विविध स्तरांवरून मुदतवाढीची मागणी वाढू लागली. शासनाने हा विचार करून थेट वर्षाच्या अखेरपर्यंत मुदतवाढ दिली असून, लाभार्थ्यांना ही अत्यंत महत्त्वाची सुविधा ठरणार आहे. (Ladki Bahin Yojana November installment)
ज्यांनी अद्याप ई-केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी 31 डिसेंबरपूर्वी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. केवायसी पूर्ण न करणाऱ्या महिलांना भविष्यात हप्ते मिळण्यात अडचणी येऊ शकतात, त्यामुळे ही प्रक्रिया विलंब न करता पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.
Ladki Bahin Yojana | नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? :
ऑक्टोबर महिन्याचा हप्ता नोव्हेंबरमध्ये जमा करण्यात आला होता. त्यामुळे नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबरमध्ये येईल, अशी अपेक्षा होती. पण राज्यात सध्या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांची आचारसंहिता लागू असल्याने हप्त्याची प्रक्रिया तात्पुरती स्थगित ठेवण्यात आली आहे. (Ladki Bahin Yojana November installment)
२ डिसेंबरला मतदान होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी पूर्ण होईल. आचारसंहिता निवडणूक निकालांसोबत शिथिल झाल्यानंतरच आर्थिक व्यवहार सुरू होऊ शकतात. त्यामुळे 4 डिसेंबरनंतर नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






