लाडक्या बहिणींना ३००० रुपये कधी मिळणार? महत्वाची माहिती आली समोर

On: December 14, 2025 6:20 PM
Ladki Bahin Yojana
---Advertisement---

Ladki Bahin Yojana | राज्यातील लाखो महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे सर्व लाभार्थी महिलांचे लक्ष लागले होते. यासंदर्भात आता एक महत्त्वाची माहिती समोर आली असून, पुढील 8 दिवसांत सरकारकडून मोठा निर्णय जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अल्पावधीतच अत्यंत लोकप्रिय ठरली आहे. या योजनेत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. मात्र, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता अद्याप लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यातच योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने e-KYC प्रक्रिया अनिवार्य केली असून, e-KYC पूर्ण न केल्यास लाभ थांबवला जाण्याची शक्यता आहे.

नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? :

राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता होती. मात्र, काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर होणाऱ्या पुढील कॅबिनेट बैठकीत निधी मंजूर केला जाण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबरनंतर होणाऱ्या कॅबिनेट बैठकीनंतर 23 किंवा 24 डिसेंबर रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. मात्र, यासंदर्भात सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Ladki Bahin Yojana | नोव्हेंबर–डिसेंबरचे 3000 रुपये एकत्र मिळणार? :

राज्यात जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकांचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी सरकारकडून नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचा हप्ता एकत्र म्हणजेच 3000 रुपये दिले जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, यावरही अधिकृत शिक्कामोर्तब होणे अद्याप बाकी आहे. (Ladki Bahin Yojana)

काही दिवसांपूर्वी माध्यमांमध्ये 52 लाख महिला अपात्र ठरल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. यावर मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट शब्दांत स्पष्टीकरण दिले आहे. प्राथमिक छाननीत 52 लाख महिला अपात्र ठरल्याच्या बातम्या निराधार असल्याचे त्यांनी सांगितले. योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी e-KYC प्रक्रिया सुरू असून ती अद्याप पूर्ण झालेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

News title :  Ladki Bahin Yojana November & December Month Installment

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now